एक्स्प्लोर

Chandramukhi : 'चंद्रमुखी' मधील नवं गाणं रिलीज; अजय गोगावलेच्या आवाजातील 'कान्हा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Chandramukhi : 'कान्हा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

Chandramukhi : सध्या सर्वत्र 'चंद्रमुखी' (Chandramukhi) च्या घुंगरांचे बोल घुमत असून 'चंद्रमुखी' या चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीमधून भरभरून प्रतिसाद मिळतं आहे. चंद्रालाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले, देत आहेत. चित्रपटातील भन्नाट गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार 'कान्हा' हे गाणं आपल्या भेटीला आलं आहे. 

खरंतर 'चंद्रमुखी' या चित्रपटाबरोबरच, चित्रपटातील  संगीतानेही सर्वांना भुरळ घातली आहे. या गाण्यात भगवान श्रीकृष्णाची भक्त असलेली चंद्रा तिच्या मनातील भावना कान्हापुढे व्यक्त करताना दिसत आहे. थेट मनाला भिडणारे हे गीत चंद्रा आणि दौलतराव यांच्यावर चित्रित करण्यात आले असून या गाण्याचे संगीत अजय-अतुल यांचे आहे. अजय गोगावले यांनी गायलेल्या 'कान्हा' या गाण्याला गुरु ठाकूर यांचे बोल लाभले आहेत. 

'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे. आजही  'चंद्रमुखी'साठी 'चित्रपटगृहासमोर हाऊसफुल'चा बोर्ड लागत आहे. 'चंद्रा' या शीर्षकगीताने तर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आजही अनेक जण या गाण्यावर थिरकत आहेत. तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांकडून मिळणारे असे प्रेम पाहून खूप छान वाटतेय. या चित्रपटाची कथा तर दमदार आहेच. मात्र चित्रपटाचे संगीतही त्याच ताकदीचे आहे.  चित्रपटातील गाण्यांचे श्रेय पूर्णपणे संगीत टीमला जात असले तरी  सादर करण्यासाठी अमृतानेही खूप मेहनत घेतली आहे आणि सगळ्यात प्रसादचा सिंहाचा वाटा आहे. 'चंद्रमुखी'वर सर्वच स्तरातून होणारा कौतुकांचा वर्षाव पाहून प्रसाद,अमृता,आदिनाथ,अजय-अतुल, एकंदरच संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे दिसत आहे. 'कान्हा' हे गाणे सध्या प्रदर्शित करण्यात आले असून इतर गाण्यांप्रमाणे हे गाणेही रसिकांना भावेल.'' 

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर यांची पटकथा-संवाद असलेल्या या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
Deeol Band 3 Update Pravin Tarde: 'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
Ayali Webseries ZEE5 : मासिक पाळी येताच लग्न, पण तरुणीला शिकायची इच्छा, प्रथेमुळे... 8 भागांची 'ही' वेब सिरीज तुमचं डोकं चक्रावून सोडेल
मासिक पाळी येताच लग्न, पण तरुणीला शिकायची इच्छा, प्रथेमुळे... 8 भागांची 'ही' वेब सिरीज तुमचं डोकं चक्रावून सोडेल
Mohan Joshi On Hindi Film Industry: 'हिंदी इंडस्ट्रीत मित्र बनवले नाहीत, पण मराठीत...', मोहन जोशींनी सांगितला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा 'तो' अनुभव
'हिंदी इंडस्ट्रीत मित्र बनवले नाहीत, पण मराठीत...', मोहन जोशींनी सांगितला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा 'तो' अनुभव

व्हिडीओ

Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Konda Surekha: लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!
लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!
Mhada Lottery : म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांची घोषणा
गुड न्यूज, म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, मिलिंद बोरीकर यांची घोषणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 सप्टेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 सप्टेंबर 2026 | गुरुवार
अजितदादांच्या जाण्याचं राजकारण नको, दादांची आई, मुलं आणि माझ्याएवढं मोठं दु:ख कोणाचं असू शकत नाही : सुनेत्रा पवार
अजितदादांच्या जाण्याचं राजकारण नको, एवढंच वाटतं : सुनेत्रा पवार
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
Dharashiv : धाराशिवमध्ये आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर
धाराशिवमध्ये आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर
CJP Controversy : सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...
Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
Embed widget