एक्स्प्लोर
अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण
मुंबई : मुंबईत साथीच्या तापाने धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनलाही डेंग्यूची लागण झाली आहे. 'कहानी 2' या सिनेमाची शूटिंग करुन नुकतीच अमेरिकेतून परतलेल्या विद्याला कालच डेंग्यूचं निदान झालं.
डॉक्टरांनी विद्याला 10 दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला असून तिच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.
सणासुदीच्या दिवसात मुंबईत साथीचा ताप, डेंग्यू, मलेरियाची लागण
महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी विद्या बालनच्या जुहू येथील निवस्थानाची पाहणी केली. ती राहत असेलल्या इमारतीच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. मात्र त्या अळ्या नष्ट केल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा 2012 मध्ये डेंग्यूमुळेच मृत्यू झाला होता. तर अनिल कपूर आणि जुही चावला यांच्या घरीही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होता. त्यामुळे महापालिकेने त्यांना नोटीसही बजावली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement