एक्स्प्लोर
श्री श्रींवरील ट्विंकलच्या ट्वीटमुळे अक्षयकुमारला ताप
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारला पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ट्विंकल खन्नाच्या एका ट्वीटनंतर श्री श्री रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या समर्थकांकडून अक्षयकुमारच्या हाऊसफुल 3 चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे ट्विटरवरील वाद?
श्री श्री रविशंकर यांनी मलाला युसूफझाईला नोबेल प्रदान करण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ट्विंकल खन्नानेही त्यांच्या योगासनावर नर्मविनोदी टिपण्णी केली होती.
ट्विंकलच्या ट्वीटनंतर श्री श्री यांचे समर्थक प्रचंड संतापले. त्यानंतर थेट अक्षयकुमारच्या आगामी हाऊसफुल चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. यामुळे ट्विंकलने आपला ट्वीट डिलीट केला.
'माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखवण्याचा नव्हता. यामागे केवळ विनोद करण्याचाच हेतू होता. मला माझ्या चुकीची जाणीव आहे.' असंही ट्विंकल खन्नाने नंतर एका ट्वीटमध्ये लिहिलं.
https://twitter.com/mrsfunnybones/status/729006404258779136
यावर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षाने ट्विंकलला टॅग करुन ट्वीट केलं. "निर्णय चुकीचा होता, की हाऊसफुल 3 चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भीती वाटत होती." असा सवाल केला, मात्र नंतर हे ट्वीटही डिलीट केलं.
https://twitter.com/mrsfunnybones/status/729169240788373504
ट्विंकलने यावर उत्तर देताना 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे अध्यक्ष मला धमकावत आहेत, असं म्हटलं. 'माझा विनोद आवडला नसेल तर मला अपमानित करा, पण माझ्या पतीला मध्ये आणून त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणे हे लज्जास्पद आहे.' असं तिने म्हटलं.
https://twitter.com/mrsfunnybones/status/729192000138809344
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement