एक्स्प्लोर
'टोटल धमाल'चे दोन पोस्टर्स रिलीज, संजय दत्त आऊट, अजय-अनिलची एंट्री
'टोटल धमाल'चे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर, अर्शद वारसी अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटाच्या दोन्ही पोस्टर्समध्ये पाहायला मिळत आहे.
मुंबई : 2007 साली प्रदर्शित झालेल्या 'धमाल' या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यानंतर 4 वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वल 'डबल धमाल' या नावाने प्रदर्शित झाला. 'डबल धमाल' पहिल्या चित्रपटाइतका सुपरहिट जरी झाला नसला तरी काही प्रमाणात हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 'टोटल धमाल' या नावाने प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
'टोटल धमाल'चे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर, अर्शद वारसी अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटाच्या दोन्ही पोस्टर्समध्ये पाहायला मिळत आहे.
'धमाल'च्या फ्रॅन्चायझीमधील पहिल्या दोन चित्रपटांमध्ये संजय दत्त प्रमुख भूमिकेत होता. परंतु या फ्रॅन्चायझीच्या तिसऱ्या भागातून संजय द्त्तला वगळण्यात आले आहे. त्याच्याऐवजी या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेता अनिल कपूर आणि धक धक गर्ल माधुरी दीक्षित या तिघांची वर्णी लागली आहे.
'टोटल धमाल'च्या निमत्ताने तब्बल 17 वर्षानंतर माधुरी आणि अनिलची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अनिल-माधुरी जोडीने 'बेटा', 'राम लखन', 'परिंदा' या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
Aaj se hoga sirf #TotalDhamaal. Gear up for The Wildest Adventure Ever!! Trailer out on 21st Jan. pic.twitter.com/R4S4rOzJIG
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 18, 2019
Never-Ending Adventure & Fun Starts In 2 Days! #TotalDhamaal Trailer Out On 21st Jan. pic.twitter.com/3B8MqD8rFF
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 19, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement