TJMM Box Office Collection : वीकेंडनंतर ‘तू झूठी मैं मक्कार’च्या कमाईत घसरण; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
जाणून घेऊयात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhooti Main Makkaar) या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
TJMM Box Office Collection Day 6 : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar) रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या चित्रपटाने वीकेंडला कोट्यवधींची कमाई केली. 50 कोटींचा टप्पा या चित्रपटाने पार केला आहे. आता हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
'तू झूठी मैं मक्कार'चं कलेक्शन
दिग्दर्शक लव्ह रंजनच्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhooti Main Makkaar) या चित्रपटामध्ये रणबीर आणि श्रद्धा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ओपनिंग-डेला या चित्रपटाने 15.73 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 10.34 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 10.52 कोटी आणि चौथ्या दिवशी 16.57 कोटींची कमाई श्रद्धा आणि रणबीरच्या 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटानं केली.
रविवारी (12 मार्च) म्हणजेच पाचव्या दिवशी या चित्रपटाने 17.08 कोटी कमावले. तर सहाव्या दिवशी म्हणजेच सोमवारी (13 मार्च) या चित्रपटाच्या कमाई घसरण झाली. सोमवारी या चित्रपटाने 6.00 कोटींचे कलेक्शन केले. सहा दिवसांमध्ये या चित्रपटाने 76.24 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
'तू झूठी मैं मक्कार'मधून बोनी कपूर यांनी अभिनयक्षेत्रात केलं पदार्पण
लव्ह रंजन लिखित आणि दिग्दर्शित 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाची निर्मिती लव्ह फिल्म्स आणि टी-सीरीज फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा यांच्यासोबतच अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून बोनी कपूर यांनी अभिनयात पदार्पण केलं. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. लवकरच हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: