एक्स्प्लोर

TJMM OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर रणबीर-श्रद्धाचा 'तू झूठी मैं मक्कार' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या कुठे पाहू शकता?

Tu Jhoothi Main Makkaar : 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Tu Jhoothi Main Makkaar : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा आता सिनेमागृहात रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

'तू झूठी मैं मक्कार' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? 

'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा 8 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच रणबीर आणि श्रद्धाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

'तू झूठी मैं मक्कार'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला

'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाची चाहते गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. ओपनिंग डेला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 15.73 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 9 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत या सिनेमाने 24.73 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर रणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. 

प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळणारा 'तू झूठी मैं मक्कार'

'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लव रंजनने सांभाळली आहे. हा रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तब्बल 95 कोटींमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'पठाण'नंतर सकारात्मक प्रतिक्रिया मिळणारा 'तू झूठी मैं मक्कार' हा बॉलिवूडचा पहिलाच सिनेमा आहे. 'पठाण'मुळे 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण चांगलं कथानक असेल तर त्या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो हे 'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमाने पुन्हा सिद्ध केलं आहे. 

तगडी स्टारकास्ट असलेला 'तू झूठी मैं मक्कार' 

'तू झूठी मैं मक्कार' या सिनेमात श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असले तरी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची झलकदेखील प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळत आहे. श्रद्धा-रणबीरसह डिंपल कपाडिया, बोनी कपूर, हसलीन कौर, राजेस जैस, आयशा राजा मिश्रादेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

संबंधित बातम्या

TJMM Box Office: श्रद्धा आणि रणबीरची बॉक्स ऑफिसवर जादू; 'तू झूठी मैं मक्कार'ने दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget