एक्स्प्लोर

Tiger Shroff : 'टायगर श्रॉफ'ने 'पर्यावरण संवर्धन' आणि 'वृक्षारोपणा'चे केले आवाहन

Tiger Shroff : 'टायगर श्रॉफ' 'भामला फाउंडेशन' या पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संघटनेसोबत जोडला गेला आहे.

Tiger Shroff Spoke About Saving Environment : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आज मुंबईत 'भामला फाउंडेशन' या पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संघटनेसोबत जोडला गेला आहे. त्यामाध्यमातून टायगर श्रॉफने 'पर्यावरण संवर्धन' आणि वृक्षारोपणाचे आवाहन केले आहे. मुंबई सारख्या शहरांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते. त्यामुळे ऑक्सीजनचीदेखील कमतरता भासते. अचानक हिरवळ कमी होत असल्याची चिंता टायगर श्रॉफने व्यक्त केली आहे. 

मागील 25 वर्ष पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रांत 'भामला फाउंडेशन' कार्य करीत आहे. शहरातील हिरवळ वाढवण्यासाठी वृक्षारोपणाची मोहिम संस्थेतेने हाती घेतली आहे. या नव्या मोहिमेचा टायगर श्रॉफ ब्रॅंड अॅम्बेसिडर आहे. त्यामुळेच टायगर मुंबईत आयोजित केलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. 

टायगर श्रॉफ कार्यक्रमात म्हणाला,"या भूमीची रक्षा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासायला लागली आहे. त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. कोणत्या बदलाची सुरुवात आपल्या घरापासून होत असते. पाण्याची बचत करणे असो वा गरज नसताना वीज बंद ठेवणे. आपल्याला अशा सर्व गोष्टींत लक्ष ठेवायला हवे. मी फक्त एक झाड लावण्यासाठी सांगत नाही. एक शहर किंवा देश नाही तर जगभरात झाडे लावण्यात यायला हवी. तसेच पर्यावरण वाचवण्यचा प्रयत्न करायला हवा. अनेक छोटे बदल समाजात परिवर्तन घडवण्यास कारणीभूत ठरत असतात. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासोबत समाजात बदल घडवला पाहिजे". 

भामला फाउंडेशन'चे एरिक सोल्हम म्हणाले, जगभरातील हिरवळ वाचवण्यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करायला हवे". त्यांनी जगभरातील दुर्लक्षित जंगले, वाढती दुर्गंधीवरदेखील लक्ष केंद्रित केले. जगभरातील पर्यावरणाला वाचवण्यासाठी त्यांनी पाऊले उचलण्याचे आश्वासनदेखील दिले. 

यानिमित्ताने  'भामला फाउंडेशन'चे संस्थापक आसिफ भामला यांनी 25 वर्षात भामला फाउंडेशनने पर्यावरणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा माहिती दिली. तसेच शहरातील वृक्षतोडीवर खंत व्यक्त केली. जनजागृती करण्यासाठी पाऊले उचलले. टायगर श्रॉफमुळे लोकांमध्ये जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget