एक्स्प्लोर

Telly Masala : कांतारा फेम ऋषभ शेट्टीची बॉलिवूडवर टीका ते गुलीगत सूरज चव्हाण रुपेरी पडद्यावरही झळकणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly masala : मालिका आणि सिने विश्वात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात आणि त्या जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता असते. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Rishab Shetty : कांतारा फेम ऋषभ शेट्टीची बॉलिवूडवर टीका, गंभीर आरोपावर नेटकरी भडकले; म्हणाले, 'हा हिंदी चित्रपटांचा कट्टर द्वेष करणारा व्यक्ती'

मुंबई : कांतारा चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिनेता ऋषभ शेट्टी याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका केली आहे. कन्नड अभिनेता आणि निर्माता ऋषभ शेट्टीने बॉलिवूड इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्री भारताला मोठ्या पडद्यावर चुकीच्या पद्धतीने दाखवते, असं त्याने म्हटलं आहे. ही बाब बॉलिवूडकरांना नक्कीच झोंबणारी आहे. ऋषभ शेट्टीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

OTT Release This Week : 'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...

OTT Release This Week : सध्याच्या काळात मनोरंजनासाठी प्रेक्षकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. थिएटर आणि छोट्या पडद्यासह ओटीटीचा पर्याय प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. ओटीटीवर ऑगस्टच्या या आठवड्यातही (19 ते 25 ऑगस्ट)   वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार (OTT Release This Week) आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या 'कल्की ए़डी 2898' ते रायन असे चित्रपट रिलीज होणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Ayesha Takia Trolled : काय होतीस तू अन् काय झालीस? अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांना बसला धक्का

Ayesha Takia Trolled : सलमान खानसोबत वॉन्टेड चित्रपटात झळकणारी ग्लॅमरस अभिनेत्री आयेशा टाकिया (Ayesha Takia) पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. मोठ्या पडद्यापासून आयशा दूर असली तरी तिला चाहते वॉन्टेड गर्ल म्हणून ओळखतात. आयेशाने या चित्रपटानंतर सिनेसृष्टीत कमबॅक केले नसले तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आयशा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने तिच्या नवीन लूकमध्ये एक फोटो शेअर केला आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आयशाचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोक तिला ट्रोल करत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Suraj Chavan : 'बिग बॉस' गाजवत असलेला गुलिगत सूरज आता रुपेरी पडद्यावरही झळकणार, मराठी चित्रपटात साकारलीय महत्त्वाची भूमिका

Suraj Chavan Latest News :  'गुलिगत धोका' म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा आणि  'झापूक-झुपूक' करत 'बिग बॉस मराठी'चा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) गाजवत असलेला रील स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  सूरजची महत्त्वाची भूमिका असलेला मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण याने मुख्य नायकाच्या मित्राची भूमिका साकारली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bigg Boss Marathi 5 : "तू नड, मी हाय, जिथं अत्याचार, तिथं सूरज खंबीर"; आर्याला गुलीगत सूरजचा फुल्ल पाठिंबा, अभिजीतलाही दिलं वचन

Bigg Boss Marathi New Season Day 26 : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी हिची हवा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सर्व वाद आणि राडे निक्कीपासून सुरु होतात आणि निक्कीवरच संपतात, असं जणू आता समीकरणच बनलं आहे. निक्कीच्या साथीला जान्हवीही इतर सदस्यांवर अरेरावी करताना पाहायला मिळते. निकी गँगविरोधात आता तगडा गेम प्लॅन तयार होताना दिसत आहे. घरातील इतर महिला सदस्य  निक्कीसोबत भिडणं टाळतात, पण आता गोलीगत चव्हाणने यामध्ये लक्ष घातलं असून निक्कीसोबत भिडण्यासाठी तो आर्याला पाठिंबा देताना दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bigg Boss Marathi : अंकिता मूर्ख, कोकणी म्हणून किती सहानुभूती घेशील, अरबाज अन् वैभवचा टीम B फोडण्याचा प्रयत्न; अभिजीतची चुगली करणाऱ्या कोकण हार्टेड गर्लला नेटकऱ्यांनी झापलं

Bigg Boss Marathi Latest Episode : बिग बॉस मराठीच्या घरात एकीकडे दोन टीम पडल्या असताना त्यातीलच काही सदस्यांचं काही बाबतीत एकमत होताना दिसत आहे. एकीकडे निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांची मैत्री घरातील सदस्यांना खटकताना दिसत आहे. त्यातच दुसरीकडे अभिजीत  दोन दगडांवर पाय ठेवून खेळत असल्याचं अनेकांना वाटतंय. यामध्ये अंकिता वालावलकर, अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण या सदस्यांचा समावेश आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
Embed widget