Bigg Boss Marathi 5 : "तू नड, मी हाय, जिथं अत्याचार, तिथं सूरज खंबीर"; आर्याला गुलीगत सूरजचा फुल्ल पाठिंबा, अभिजीतलाही दिलं वचन
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून निक्कीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. निक्कीचा सामना करण्यासाठी सूरज आता आर्याला पाठिंबा देताना पाहायला मिळणार आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 26 : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी हिची हवा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सर्व वाद आणि राडे निक्कीपासून सुरु होतात आणि निक्कीवरच संपतात, असं जणू आता समीकरणच बनलं आहे. निक्कीच्या साथीला जान्हवीही इतर सदस्यांवर अरेरावी करताना पाहायला मिळते. निकी गँगविरोधात आता तगडा गेम प्लॅन तयार होताना दिसत आहे. घरातील इतर महिला सदस्य निक्कीसोबत भिडणं टाळतात, पण आता गोलीगत चव्हाणने यामध्ये लक्ष घातलं असून निक्कीसोबत भिडण्यासाठी तो आर्याला पाठिंबा देताना दिसत आहे.
निकी गँगविरोधात तगडा गेम प्लॅन
'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 5) नवा सीझन सुरू होऊन 25 दिवस पूर्ण झाले आहेत. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. यातच सूरज चव्हाणची वेगळी फॅन फॉलोईंग पाहायला मिळत आहे. गोलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला 'बिग बॉस मराठी'चा खेळ कळू लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार आहे.
आर्याला गुलीगत सूरजचा फुल्ल सपोर्ट
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण अभिजीत सावंत आणि आर्या जाधवला म्हणत आहे, "जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार... बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा..तू नड".
सूरज चव्हाणला बिग बॉसचा गेम कळला
View this post on Instagram
'बिग बॉस' खतरनाक आहेत : अरबाज पटेल
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अरबाज पटेल म्हणत आहे, "बिग बॉस' खतरनाक आहेत. माझ्या कॅप्टनसीमध्ये डिलेमा दिलाय त्यांनी. कॅप्टनसी बरोबर सुरू होती. इम्युनिटी हा सर्वात मोठा प्रश्न होता. या इंडस्ट्रीत मी नवीन आहे". त्यावर अंकिता म्हणते,"मला प्रामाणिकपणे तुझा खेळ वीक वाटत नाही. मला वैभवचा खेळ वीक वाटतो".
महत्त्वाच्या इतर बातम्या :