एक्स्प्लोर

Suraj Chavan : 'बिग बॉस' गाजवत असलेला गुलिगत सूरज आता रुपेरी पडद्यावरही झळकणार, मराठी चित्रपटात साकारलीय महत्त्वाची भूमिका

Suraj Chavan Latest News : 'झापूक-झुपूक' करत बिग बॉस मराठीचा सीझन गाजवत असलेला रील स्टार सूरज चव्हाण आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Suraj Chavan Latest News :  'गुलिगत धोका' म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा आणि  'झापूक-झुपूक' करत 'बिग बॉस मराठी'चा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) गाजवत असलेला रील स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  सूरजची महत्त्वाची भूमिका असलेला मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण याने मुख्य नायकाच्या मित्राची भूमिका साकारली आहे.

ग्रामीण पार्श्वभूमीवरील थरारक प्रेमकहाणी असलेला "राजाराणी" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण या चित्रपटात आहे. अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. राजाराणीच्या माध्यमातून सूरज चव्हाण ही आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सूरजची भूमिका असलेला 'राजाराणी' हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता रोहन पाटील याने 'एबीपी माझा' सोबत बोलताना सांगितले की, या चित्रपटाच्या माध्यमातून सूरज मराठी सिनेसृष्टीत झळकणार आहे. या चित्रपटाचे जवळपास सगळं चित्रीकरण 2023 मध्ये झाले होते. मात्र, मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरील चित्रपटामुळे राजाराणी चित्रपट मागे पडला होता. आता आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. या चित्रपटात सूरजची महत्त्वाची भूमिका असल्याचे रोहनने सांगितले. 

चित्रपटात सूरजची भूमिका काय?

''राजाराणी'' या चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील प्रेमप्रकरणावर आहे. सूरज  चव्हाण या चित्रपटातील नायक असलेल्या रोहन पाटीलच्या मित्राच्या भूमिकेत आहे. कठीण काळात मदत करणारा, मित्रावरील संकट आपले समजणारा, मित्र किती प्रामाणिक असावा, असे दाखवणारी भूमिका सूरजची असल्याचे रोहन पाटीलने सांगितले. सूरज हा चित्रपटात कॉमेडीसह गंभीर अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी सूरजकडून आम्हाला अभिनय करून घ्यावा लागला. त्याचे संवाद पाठांतर करून घ्यावे लागले. सूरजला सांगितलेल्या गोष्टी पटकन आत्मसात करतो. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान विशेष काही अडचण जाणवली नसल्याचे सांगण्यात आले. या चित्रपटाचे डबिंग सूरज चव्हाण स्वत: केली आहे.

चित्रपटात सत्य कथा...

अभिनेता रोहन पाटील याने सांगितले की, चित्रपटाचे लेखक  गोवर्धन दोलताडे आणि आम्ही काहीजण सोलापूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात बसलो होतो. त्यावेळी एक जोडपं पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर या चित्रपटाची कथा सुचली. चित्रपटात सूरज साकारत असलेला मित्र देखील त्या जोडप्यांच्या मदतीसाठी धावणारा होता असेही रोहन पाटील यांनी सांगितले. 

 'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
Embed widget