एक्स्प्लोर

Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

न्यायमूर्ती नलिन कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने पीडितेविरुद्ध लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला.

Allahabad High Court on Live in Relationship : 'लिव्ह-इन रिलेशनशिपला (Allahabad High Court on Live in Relationship) सामाजिक मान्यता नाही. तरीही तरुण अशा नात्यांकडे आकर्षित होतात. कारण, पुरुष असो वा स्त्री, दोघांनाही आपल्या जोडीदाराप्रती जबाबदारी टाळायची असते. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपकडे तरुणाईचे आकर्षण वाढत आहे. आता आपण सर्वांनी याचा विचार करण्याची वेळ आली आहे. समाजातील नैतिक मूल्यांचे जतन करण्यासाठी काहीतरी चौकट आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशा शब्दात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपवर टिप्पणी केली.

संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...

न्यायमूर्ती नलिन कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने पीडितेविरुद्ध लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आणि नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला. एफआयआरनुसार आरोपीने पीडितेचा गर्भपातही करून घेतला. जातीसंबंधित टिप्पण्या केल्या. तसेच मारहाण केल्याचा आरोप होता. या खटल्यात जामीन मिळावा यासाठी आरोपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. फिर्यादीचा दावा खोटा असून या प्रकरणातील पीडित महिला प्रौढ महिला होती, असे वकिलाने सांगितले. दोघांमधील सर्व संबंध सहमतीचे होते. आरोपीच्या संमतीशिवाय किंवा स्वेच्छेशिवाय त्यांच्यात शारीरिक संबंध कधीच झाले नाहीत,असेही वकिलाने सांगितले. 

पीडिता 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती 

पीडितेवर सुनावणी करताना हायकोर्टाने म्हटले की, तुम्ही सुमारे 6 वर्षे आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. गर्भपाताची कथित वस्तुस्थिती ही केवळ निराधार आरोप होता. आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन दिले नाही किंवा कधीच दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तुम्ही दोघेही सहमतीने नात्यात होता. आता तक्रार का करताय? समाजात नैतिक मूल्ये जपण्यासाठी काही चौकट आणि उपाय शोधण्याची गरज हायकोर्टाने व्यक्त केली. आरोपी एक प्रौढ महिला आहे, तिचे आरोपीसोबत संमतीने संबंध होते, असेही न्यायालयाने सांगितले. 

नोएडामध्ये लिव्ह-इन पार्टनरने आत्महत्या केली

याआधी नोएडामधील अभियंत्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी त्याच्यासोबत 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सांगितले की, मयंक चंदेल (27, मूळचा शाहजहांपूर जिल्ह्यातील जलालाबादचा रहिवासी आहे) याने 13 डिसेंबर रोजी नोएडा येथील सेक्टर-73 येथील महादेव अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती, जिथे तो प्रीती सागर नावाच्या मुलीसोबत राहत होता. सेक्टर-113 पोलिस स्टेशनचे प्रभारी कृष्ण गोपाल शर्मा यांनी सांगितले की, मयंकच्या आईने रात्री तक्रार दाखल केली असून, तिने प्रीतीवर आपल्या मुलावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. प्रीती मयंकला टोमणे मारत असे, त्यामुळे कंटाळून त्याने हे पाऊल उचलले, असा आरोप केला आहे. तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
Embed widget