Jhund Teaser | आया ये शेरों का झुंड है... नागराज मंजुळेच्या 'झुंड'चा टीझर रिलीज
नागराज मंजुळे यांचा हा पहिला बॉलिवूडपट असणार आहे. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिकेत दिसणार आहेत.
मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या झुंड सिनेमाचा दमदार टीझर रिलीज झाला आहे. 1 मिनिटं 12 सेकंदाच्या या टीझरमध्ये हातात विटा, साखळ्या, बॅट, हॉकी स्टिक घेतलेल्या मुलांचा एक ग्रुप दिसत आहे. टीझरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड नही कहिए सर, टीम कहिये...टीम' या वाक्याने होते. विशेष म्हणजे यात अमिताभ बच्चन दिसत नाहीत. अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवर हा टीझर शेअर केला आहे. सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण नागपुरात झालं असून हा चित्रपट 8 मे 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. कालच (20 जानेवारी) या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं होतं, ज्यात अमिताभ बच्चन पाठमोरे उभे असलेले दिसत आहेत.
'सैराट'च्या यशानंतर नागराज मंजुळे आता 'झुंड' हा पहिला हिंदी चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा फुटबॉल प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
अनेक वादांना बाजूला सारत हा चित्रपट अखेर पूर्ण झाला आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच अमिताभ यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर निर्मात्यांनी मनधरणी केल्यानंतर अमिताभ बच्चन पुन्हा या चित्रपटात काम करण्यास तयार झाले आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिकेत दिसणार आहेत.
बहुप्रतिक्षीत 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज; बॉलिवूडचे महानायक दिसणार मुख्य भूमिकेत
संबंधित बातम्या :
नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मध्ये रिंकू-आकाश!
बिग बी अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड' ची तारीख ठरली
नागराजच्या 'झुंड'साठी बिग बी दीड महिना नागपुरात