एक्स्प्लोर

बिग बी अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या 'झुंड' ची तारीख ठरली

फॅन्ड्री, सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षी आपल्या 'झुंड' या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतात. या चित्रपटात बारसे यांची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत.

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आणि 'सैराट'कार नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेल्या बहुचर्चित 'झुंड' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.  येत्या 20 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. अद्याप नागराज मंजुळे यांच्याकडून याबाबत दुजोरा मिळाला नसला तरी याच तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. फॅन्ड्री, सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षी आपल्या 'झुंड' या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतात. या चित्रपटात बारसे यांची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत. नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूडमधील पहिल्या ‘झुंड’ या सिनेमातून बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीला दिवसांपूर्वी माघार घेतली होती. सतत सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता.  तसंच त्यांनी नागराज मंजुळे आणि निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही परत केले होते. मात्र नागराज मंजुळेच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात अमिताभ बच्चन असावेत, यासाठी निर्मात्यांचा प्रयत्न होते. त्यांनी केलेली मनधरणी अखेर यशस्वी ठरली आणि त्यांनी चित्रपट करण्यास होकार दिला होता. विरोधामुळे तारखा लांबल्या! ‘सैराट’ या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर नागराज यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्याच हिंदी सिनेमात काम करण्यासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांना राजी केलं होतं.त्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला. याचा परिणाम सिनेमाच्या शेड्युलवर पडत गेल्याने, सातत्याने तारखा पुढे पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचं वेळापत्रक बिघडलं. बिग बींनी मागील वर्ष हे या सिनेमासाठी राखून ठेवलं होतं. मात्र ते वेळेनुसार झालं नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हा सिनेमाच सोडण्याचा निर्णय घेतला होता. झुंडच्या चित्रीकरणासाठी नागराज मंजुळे यांनी विद्यापीठाच्या मैदानातील काही भागावर सेट उभा केला होता. हा चित्रपट खेळावर आधारित असल्याने विद्यापीठाकडून त्याचा सहानभूतीपूर्वक विचार करत, त्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र विद्यापीठाच्या जागेचा व्यावसायिक वापर झाला असून, लीजच्या कराराचा भंग झाल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता.  त्यामुळे सिनेमाचा सेट सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानातून हटवण्याचा आदेश विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिला होता. अशा असंख्य अडचणींनंतर 'झुंड'चे चित्रीकरण नागपुरात यशस्वीरित्या पार पडले. आता हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget