बहुप्रतिक्षीत 'झुंड' चित्रपटाचं पोस्टर रिलीज; बॉलिवूडचे महानायक दिसणार मुख्य भूमिकेत
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटाचं पोसटर रिलीज करण्यात आलं असून या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मुंबई : सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळे आता आपला 'झुंड' हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाच बॉलिवूडचे बिगबी दिसणार असून सध्या या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन पाठमोरे उभे आहे. तसेच बॉलिवूडचे बिगबी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
वादविवाद आणि हो-नाहीमध्ये अडकलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आलं आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाचे कथानक फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून या चित्रपटाती निर्मिती करत आहेत. सैराट फेम नागराज मंजुळे यांचा हा पहिला बॉलिवूडपट असणार आहे.
T 3415 - JHUND ... झुंड !! ... JHUND ... झुंड !!#Jhund@Nagrajmanjule @itsBhushanKumar #KrishanKumar #RaajHiremath #SavitaRajHiremath #GargeeKulkarni #MeenuAroraa @AjayAtulOnline @tandavfilms @aatpaat @TSeries pic.twitter.com/4iTXi6mkc1
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 20, 2020
चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच मेकर्सवरच कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. अनेक वादांना बाजूला सारत हा चित्रपट अखेर पूर्ण झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी 'झुंड' हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. शूटिंग दरम्यानच अमिताभ यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर निर्मात्यांनी मनधरणी केल्यानंतर अमिताभ बच्चन पुन्हा या चित्रपटात काम करण्यास तयार झाले आहेत. 'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिकेत झळकणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा मराठी चित्रपट सैराट प्रचंड गाजला होता. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात सैराटच्या कथानकाने आणि सैराटच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. तसेच या चित्रपटाने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले होते.
संबंधित बातम्या :