Swapnil Joshi: "ती सल कायम राहिल माझ्या मनात..."; स्वप्नील जोशीच्या ट्वीटनं वेधलं लक्ष
सध्या स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. स्वप्नीलच्या एका चाहत्यानं त्याला ट्विटरवर ट्वीट शेअर करुन एक प्रश्न विचारला.
Swapnil Joshi: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. स्वप्नीलनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी देखील स्वप्नीलची ओळख आहे. मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या माध्यमातून स्वप्नील प्रेक्षकांच्या भेटीस येतो. सध्या स्वप्नील सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. स्वप्नीलच्या एका चाहत्यानं त्याला ट्विटरवर ट्वीट शेअर करुन एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला स्वप्निलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
स्वप्नीलला चाहत्यानं विचारला प्रश्न
'मराठी इंडस्ट्रीमध्ये अशी एक कुठली अभिनेत्री किंवा अभिनेता आहे? ज्यांच्या सोबत काम करायचं आहे पण त्यांच्यासोबत काम करण्याचा अजून योग आला नाही?' असा प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून एका चाहत्यानं स्वप्निलला विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला स्वप्नीलनं रिप्लाय दिला आहे.
स्वप्नीलचं उत्तर
स्वप्नीलनं चाहत्याच्या ट्वीटला उत्तर दिलं, 'आणि दुर्दैवने हा योग येणार पण नाही! पण मला स्मिता पाटील जी यांच्या बरोबर एक फ्रेम तरी शेअर करायला मिळायला हवी होती! ती सल कायम माझ्या मनात राहिल!'
आणि दुर्दैवने येणार पण नाही!
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) February 22, 2023
पण मला स्मिता पाटिल जी यांच्या बरोबर एक frame तरी share करायला मिळायला हवी होती ! ती सल कायम राहिल माझ्या मनात ! https://t.co/Pi40grRPVd
एका नेटकऱ्यानं ट्वीट शेअर करुन स्वप्नीलच्या वाळवी या चित्रपटाचं कौतुक केलं.
#वाळवी चित्रपटाचा शेवट आपल्या मेंदूचा दोन सेकंदासाठी का होईना 'भुगा' करतो.असे काही होईल हे अनपेक्षित असल्यामुळे,चित्रपट संपल्याची हूरहूर मनात ठेऊन जड पावलांनी आपण चित्रटगृहाबाहेर पाऊल ठेवतो.@swwapniljoshi दादा यापुढे काही दिवस तरी चिप्स खाताना ही पात्र आठवली नाही म्हणजे झालं 😜
— suneel kothule 🇮🇳 (@SunilKothule) February 23, 2023
स्वप्नीलनं दुनियादारी, मितवा, मुंबई-पुणे-मुंबई यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्याच्या समांतर या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याचा वाळवी हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ती तेव्हा तशी या मालिकेतील स्वप्नीलच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. स्वप्नीलचा वाळवी हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी रिलीज झाला. या चित्रपटात स्वप्नील जोशी बरोबरच सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. स्वप्नीलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :
Smita Patil: तिच्याविना आजही मैफिल सुनी सुनी... स्मिताचं गारुड आजही कायम का?