एक्स्प्लोर

Smita Patil: तिच्याविना आजही मैफिल सुनी सुनी... स्मिताचं गारुड आजही कायम का?

Smita Patil Death Anniversary : 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या' हे गीत ऐकताना नेहमीच स्मिताचा तो भावनावश चेहरा आजही समोर येतो. 

मुंबई: काही लोक आपल्या व्यक्तीमत्वाची अशी छाप सोडून जातात की त्यांना विसरावं म्हटलं तरी विसरणं शक्य नसतं. स्मिता पाटील हे नाव त्यापैकीच एक. अभिनयाची अनभिषक्त सम्राज्ञी, कोट्यवधी मनांवर अधिराज्य करणारी स्मिता पाटीलचं आजच्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 1986 रोजी निधन झालं. वयाच्या केवळ 31 व्या वर्षी स्मिताला आजारपणामुळे हे जग सोडावं लागलं आणि अवघी सिनेसृष्टी हळहळली. स्मिताविना आजही मैफिल सुनी सुनी अशीच आहे.

स्मिता पाटील हिचा जन्म पुण्याचा. तिचे वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी आणि समाजवादी विचारांचे नेते, तर आई विद्याताई पाटील या समाजसुधारिका. आई-वडील हे पुरोगामी विचाराचे असल्याने तसेच संस्कार स्मितावर झाले. स्मिता लहानपणापासूनच नाटकात भाग घ्यायची. ती अॅथलिटही होती. नंतरच्या काळात स्मिताचे परिवार पुण्याहून मुंबईला शिफ्ट झालं आणि तिच्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं.

Smita Patil as News Reader on Doordarshan: वृत्तनिवेदिकेची नोकरी आणि आयुष्याला नवं वळण 

मुंबईत असताना वयाच्या 18 व्या वर्षी स्मिताला दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदकाची नोकरी मिळाली. त्याचवेळी प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या नरजेत आली आणि त्यानी तिला चित्रपटात अभिनयाची संधी दिली. 'चरणदास चोर' या चित्रपटात तिने एक छोटासा अभिनय केला. नंतर निशांत या चित्रपटातली तिला संधी मिळाली. 

Smita Patil in Parallel Cinema: आईचा प्रभाव आणि समांतर चित्रपट गाजवले 

स्मिता पाटील हिच्या अभिनयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिने बहुतांश समांतर चित्रपटात काम केलं. स्मिता पाटील हिच्या आयुष्यावर तिच्या आईचा प्रभाव असल्याने तिचे व्यक्तिमत्वही तसंच खुलत गेलं. त्यामुळेच समांतर चित्रपटातील तिचा अभिनय हा नैसर्गिक असाच होत गेला. 'उंबरठा' या मराठी चित्रपटात साकारलेली भूमिका ही स्मिताच्या आईचीच असल्याचं स्पष्ट होतंय. 

स्मिताने सुनिल दत्त यांनी निर्मित केलेल्या कँन्सरवर आधारित 'दर्द का रिश्ता' चित्रपटात केवळ एक रुपयाचं मानधन घेऊन काम केलं. तसेच अनेक चित्रपटांमध्ये समांतर भूमिका केल्या. या गोष्टी स्मिताच्या अंगभूत होत्या. 'शक्ती' आणि 'नमक हलाल' अशा व्यावसायिक चित्रपटातही स्मिताने काम केलं. नमक हलाल या चित्रपटातील 'आज रपट जाये तो हमे ना उठय्यो' हे गाणं प्रचंड गाजलं. 

Smita Patil Death Anniversary: स्मिताच्या आयुष्यात वादळ 

स्मिता पाटील म्हणजे एक वादळच होतं. पण याच वादळाच्या आयुष्यात एक वादळ आलं. विवाहित असलेल्या राज बब्बरवर तिचं प्रेम जडलं. महिलांच्या समस्येवर स्मिता नेहमीच आवाज उठवायची. त्याच स्मिताने एका लग्न झालेल्या महिलेच्या आयुष्याचं नुकसान करू नये असं तिच्या आईला वाटायचं. राज बब्बरने तिच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे स्मिताच्या आणि राज बब्बरच्या लग्नाला त्यांचा विरोध होता. पण स्मिता प्रचंड जिद्दी होती. तिने राज बब्बरलाच आपला जोडीदार निवडला.

आयुष्यातील अत्यंत खडतर तणावाच्या काळातून, मानसिकतेतून जाणाऱ्या स्मिताला मुलगा झाला, पण त्यानंतर तिला नेटल प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं. समाजातील रूढी परंपरांना आपल्या रील आणि रिअल लाईफमध्ये आव्हान देणाऱ्या स्मिताला यातून बाहेर पडता आलं नाही आणि यातच तिचं निधन झालं. स्मिता नावाच्या या वादळानं 13 डिसेंबर 1986 रोजी जगाचा निरोप घेतला. 

चित्रपट सृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल स्मिताला 1985 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, निशांत, वारीस, अर्थ,  मिर्च मसाला, आज, नजराणा या चित्रपटातील भूमिकांनी तिने रसिकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. तसेच सामना, जैत रे जैत, राजा शिव छत्रपती, उंबरठा या सारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची उंची दाखवली. 

'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात् आहे' हे गीत ऐकताना आजही अनेकांच्या डोळ्यासमोर स्मिता पाटील येते. स्मिता पाटीलचे निधन होऊन तब्बल 36 वर्षे झाली तरी ती रसिकांच्या मनावर आजही राज्य करते. स्मिताविना आजही मैफिल सुनी सुनी अशीच वाटतेय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget