एक्स्प्लोर
सुशांत राजपूतने 15 कोटींच्या जाहिरातीची ऑफर धुडकावली
आता सुशांतसिंह राजपूत अभय देओलची ही मोहीम पुढे नेताना दिसत आहे.

मुंबई : चेहऱ्याच्या रंग उजळवणाऱ्या क्रिमची जाहिराती करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर अभिनेता अभय देओलने मागील वर्षी जोरदार टीका केली होती. यानंतर अशाप्रकारच्या जाहिराती करणाऱ्यासंदर्भात वाद-विवाद रंगला होता. आता सुशांतसिंह राजपूत अभय देओलची ही मोहीम पुढे नेताना दिसत आहे.
सुशांतने एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीची ऑफर नुकतीच धुडकावली आहे. महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीसाठी त्याला 15 कोटी रुपयांची ऑफ देण्यात आली होती.
अशाप्रकारच्या वस्तूंची जाहिरात करुन समाजात चुकीचा मेसेज जातो. एखाद्या वस्तूबाबत चुकीचा मेसेज जाऊ ही अभिनेत्याची जबाबदारी आहे, असं सुशांतचं म्हणणं आहे.
'राबता' या सिनेमात दिसलेला सुशांत सिंह राजपूत आगामी 'ड्राईव्ह' आणि 'चंदा मामा दूर के'च्या चित्रीकरणात व्यस्क आहे. तसंच तो 'केदारनाथ' नावाच्या चित्रपटात सारा अली खानसोबतही झळकणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















