मुंबई पोलीस की सीबीआय? सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा तपास कोण करणार? सुप्रीम कोर्ट निकाल देणार!
सुप्रीम कोर्टाने 11 ऑगस्ट रोजी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत आपला आदेश सुरक्षित ठेवला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार की सीबीआय याचा निर्णय आज सुप्रीम कोर्ट देऊ शकतं

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी कोण करणार, मुंबई पोलीस की सीबीआय यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देऊ शकतं. आज सर्व पक्षकार सुप्रीम कोर्टात लेखी स्वरुपात युक्तिवाद मांडतील. त्यानंतर सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने करायचा की मुंबई पोलिसांनी हे सुप्रीम कोर्टाला ठरवायचं आहे.
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (11 ऑगस्ट) या प्रकरणी आपला आदेश सुरक्षित ठेवून सर्व पक्षकारांना आपला युक्तिवाद लेखी स्वरुपात जमा करण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती यांनी सीबीआयच्या वतीने दाखल एफआयआर मुंबई पोलिसांना सोपवण्याची मागणी केली आहे. तर बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी याचा विरोध केला आहे.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला
मंगळवारी कोर्टात काय झालं?
1. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी तिन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर आपला निकाल राखून ठेवला होता
2. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू मांडताना अभिषेक मनु सिंघवी यांनी बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुरु असल्याचं म्हटलं.
3. रियाचे वकील श्याम दिवाण यांनी कुठलाही निर्णय देण्याआधी कायद्याप्रमाणे केस मुंबईला शिफ्ट करा अशी मागणी केली आहे.
4. तर बिहार सरकारची बाजू मांडताना महाधिवक्ता तुषार मेहतां यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं.
महत्त्वाच्या बातम्या :
- सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज; संजय राऊतांचा आरोप, कुटुंबियांकडून मात्र खंडन
- सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड
- सुशांत सिंहच्या घरी झालेल्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल; रियाची मात्र अनुपस्थिती, पुजाऱ्यांचा खुलासा
- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या ईडीच्या 9 तास चौकशीत काय झालं?
- दिशा सुशांतची मॅनेजर नव्हतीच; मुंबई पोलिसांकडून स्पष्ट.. दोघांमधील व्हाट्सएप चॅटवरील Exclusive संभाषण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
