वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज; संजय राऊतांचा आरोप, कुटुंबियांकडून मात्र खंडन
संजय राऊत धादांत खोटं बोलत असल्याचा आरोप सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. तसेच सुशांतच्या वडिलांचं एकच लग्न झालं होतं, त्यांनी दुसरं लग्न केलचं नाही, असंही सुशांतच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.
मुंबई : सीबीआयने सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरण चांगलचं तापलं आहे. सीबीआयने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी तपास सुरु केला आहे. अशातच आता याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यातील नातं फारसं चांगलं नव्हतं. संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात प्रकाशिक केलेल्या लेखातून हा दावा केला आहे. परंतु, सुशांतच्या कुटंबियांनी संजय राऊत यांनी केलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.
संजय राऊत यांनी दावा केला आहे की, सुशांत आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश नव्हता. संजय राऊत यांनी याप्रकरणी एक प्रश्न उपस्थित केला आहे की, 'सुशांत सिंह राजपूत किती वेळा आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी पाटण्याला गेला होता?' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर येऊ नये म्हणून यावर राजकारण करण्यात आलं आणि मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण काढून घेण्यात आलं. दरम्यान, के. के. सिंह यांच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या आरोपांचं खंडन करताना, ते धादांत खोटं बोलत असल्याचं सुशांतचे मामा आर. सी. सिंह यांनी म्हटलं आहे.
सुशांतचे कुटुंबिय याप्रकरणी बोलताना म्हणाले की, 'संजय राऊत खोटं बोलत आहेत. सुशांतच्या वडिलांचं एकच लग्न झालं आहे, त्यानी दुसरं लग्न केलंच नाही. सर्व चुकीच्या गोष्टींना लपवण्यासाठी चुकीचे आरोप केले जात आहेत.'
पाहा व्हिडीओ : वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज; संजय राऊतांच्या आरोपांचं कुुटुंबियांकडून खंडन
संजय राऊत एवढ्यावरच नाही थांबले तर त्यांनी बिहार सरकारवरही राजकारण केल्याचा आरोप लावला आहे. ते म्हणाले की, 'बिहार दिल्लीमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात राजकारण केलं जात आहे. महाराष्ट्र सरकार विरोधात कट रचला जात आहे. मुंबई पोलीस याप्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी सक्षम होते.'
संजय राऊत म्हणाले की, आता याप्रकरणी सीबीआय तपासणी करत आहे आणि या तपासातील सत्य बाहेर येईल की, सुशांतचे आपल्या वडिलांसोबतचे संबंध फारसे चांगले नव्हते. याआधीही त्यांनी बिहार सरकारवर निशाणा साधला होता. संजय राऊत म्हणाले की, 'नितीश यांना वाटतं की, याप्रकरणी राजकारण केल्यानंतर बिहार निवडणुकीत त्यांना फायदा होणार आहे. नितीश कुमार सिनियर नेते आहेत. त्यांना कळलं पाहिजे की, 'त्यांना काय पाहिजे?'
रियाकडूनही सुशांतचे कुटुंबियांशी संबंध चांगले नसल्याचा आरोप
संजय राऊत यांच्याआधी अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेही आरोप लावला होता की, सुशांतचं त्याच्या कुटुंबियांशी खासकरून त्याच्या बहिणीसोबत संबंध फारसे चांगले नव्हते. रियाने सुशांतसोबतचं आपलं चॅट सोशल मीडियावर शेअर केलं होतं. या चॅटमध्ये सुशांत आणि त्याची बहीण प्रियांकामध्ये कुठल्यातरी गोष्टी वरून वाद होता, त्यावरुन सुशांत नाराज असल्याचं समोर आलं आहे. या चॅटमध्ये प्रियांका आपला रूम मेट सिद्धार्थ पीठानेला भडकवत असल्याचं सुशांतने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड
- सुशांत सिंहच्या घरी झालेल्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल; रियाची मात्र अनुपस्थिती, पुजाऱ्यांचा खुलासा
- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या ईडीच्या 9 तास चौकशीत काय झालं?
- दिशा सुशांतची मॅनेजर नव्हतीच; मुंबई पोलिसांकडून स्पष्ट.. दोघांमधील व्हाट्सएप चॅटवरील Exclusive संभाषण