सुशांतने दोन दिवसांत मोडली कोट्यवधींची एफडी, ईडीच्या तपासात धक्कादायक खुलासा; रियाची पुन्हा चौकशी
ईडी चौकशीदरम्यान समोर आलेल्या सर्व गोष्टींची पडताळणी करत आहे. ईडी आता पुढील काही दिवस तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबींची सत्यता पडताळून पाहणार आहे. त्यानंतरच रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरण दररोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. सध्या सुशांत सिंह मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी करत असून संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवत आहेत. ईडीला तपासात अनेक गोष्टी समजल्या आहेत. अशीच एक धक्कादायक गोष्ट ईडीच्या तपासात समोर आली आहे. ईडीच्या चौकशीत समोर आलं आहे की, अत्यंत कमी वेळात सुशांत सिंह राजपूतने अनेक कोट्यवधींच्या एफडी मोडल्या होत्या. ईडीने केलेल्या तपासानुसार, सुशांतच्या खात्यात दोन दिवसांतच साडेचार कोटींची एफडी मोडण्यात आली. यापैशातून एका फ्लॅटचे हफ्ते भरले जात होते. ज्या फ्लॅटमध्ये त्याची आधीची एक्स गर्लफ्रेंड राहत होती.
आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासादरम्यान, सुशांतच्या खात्यात कोट्यवधी रुपये असल्याची माहिती समोर आली होती. तसेच, सुशांतच्या खात्यातून एका फ्लॅटसाठीचे हफ्ते भरले जात असून त्यामध्ये त्याची माजी गर्लफ्रेंड राहते, असं समोर आलं आहे. आतापर्यंतच्या तपासात जी चौकशी करण्यात आली त्यानुसार, सुशांत आधीच्या गर्लफ्रेंडवरही खर्च करत होता. तसेच त्याचा एका दिवसाचा खर्च 50 हजारांहून अधिक होता.
ईडी चौकशीदरम्यान समोर आलेल्या सर्व गोष्टींची पडताळणी करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फ्लॅट सुशांत सिंह राजपूतच्या नावावर आहे. तसेच ज्या बँक खात्यातून सुशांत सिंह या फ्लॅटचे हफ्ते भरत होता. त्या खात्यात जवळपास 35 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ : मुंबई पोलीस की सीबीआय? तपास कोण करणार? सुप्रीम कोर्ट निकाल देणार!
FD बाबात रियाकडेही चौकशी
सुशांत सिंह राजपूतच्या खात्यात साडेचार कोटी रुपयांच्या एफडीबाबत रियाकडेही चौकशी करण्यात आली. रियाला विचारण्यात आले की, तुम्हीला माहिती आहे का? एफडी अचानक दोन दिवसांत का तोडण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर देताना रियाने सांगितलं की, तिला यासंदर्भात काहीच माहिती नाही. याबाबत सुशांतच सांगू शकतो की, त्याने असं का केलं होतं?
दरम्यान, सुशांत सिंहच्या कोटक महिंद्रा बँक खात्यात 26 नोव्हेंबर रोजी एफडी करण्यात आली होती आणि 28 नोव्हेंबर रोजी साडेचार कोटीं रुपयांची एफडी मोडून त्यातील एक कोटी रुपयांच्या दोन वेगवेगळ्या एफडी करण्यात आल्या होत्या. म्हणजेच, त्या एफडीमधून अडीच कोटी रुपये काढण्यात आले होते. ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी आता पुढील काही दिवस तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबींची सत्यता पडताळून पाहणार आहे. तसेच त्यानंतर रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- मुंबई पोलीस की सीबीआय? सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा तपास कोण करणार? सुप्रीम कोर्ट निकाल देणार!
- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला
- सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
- वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज; संजय राऊतांचा आरोप, कुटुंबियांकडून मात्र खंडन
- सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड
- सुशांत सिंहच्या घरी झालेल्या पूजेचा व्हिडिओ व्हायरल; रियाची मात्र अनुपस्थिती, पुजाऱ्यांचा खुलासा