एक्स्प्लोर

Mumbai Crime: मैत्रिणी चिडवायच्या, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील; मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा प्रियकराच्या छळाला कंटाळून टोकाचा निर्णय

Crime News Love: डेटिंग अॅपवरुन ओळख, वर्षभराच्या रिलेशनशिपमध्ये बॉयफ्रेंडने स्तुतीला छळ छळलं. मुंबई पोलिसांनी फजल खानला बेड्या ठोकल्या, अँटॉप हिलमधील घटनेमुळे खळबळ

Mumbai Crime: मुंबईत एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 8 मार्च रोजी या तरुणीने गळफास लावून आत्महत्या (Suicide News) केली होती. ही तरुणी डॉक्टर (Doctor) असून तिचे नाव स्तुती बजरंग सोनावणे असे होते. मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे यांनी डॉ. स्तुती बजरंग सोनावणे (Stuti Sonawane) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (31) याला लोअर परळ (Lower Parel) येथून अटक केली. न्यायालयाने फजल मोहम्मद खान याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mumbai Crime News)

डॉ. स्तुती सोनावणे यांच्या आत्महत्येमुळे मुंबई (Mumbai News) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सहा पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यात फैजल मोहम्मद खानकडून सतत मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख आहे. फजलच्या छळाची माहिती स्तुतीने आपल्या मैत्रिणीला दिली होती. त्यात तिने “तू एक दिवस फ्रिज मध्ये सापडशील” असे वारंवार म्हणायचा, असे सांगितले होते. स्तुती सोनावणे आणि फजल खान यांची ओळक एका डेटिंग अ‍ॅपवरुन झाली. त्यानंतर ते गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, या दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्यावेळी फजल खान तिला मारुन टाकण्याची धमकी द्यायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

या सगळ्या त्रासाला कंटाळून डॉ. स्तुती सोनावणे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 8 मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील जेवण्यासाठी बाहेर गेले होते. हे दोघे घरी परत आल्यावर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. त्यावेळी स्तुतीच्या वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला असता स्तुतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन स्तुती सोनावणे हिचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालानुसार डॉ. स्तुती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत. या तपासातून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.

आणखी वाचा

तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी

डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
धक्कादायक! नागपुरात जुन्या वादातून तरुणाला संपवलं, 11 अल्पवयीन आरोपींना अटक
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
ड्रग्ज विक्रीसंदर्भात अकोला पोलिसांची मोठी कारवाई, लाखो रुपये किंमतीच ड्रग्ज जप्त, मुख्य टोळीचा पर्दाफाश होणार
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget