एक्स्प्लोर

Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ

Arun Tupe Death: मृत्यूच्या अवघ्या २४ तासांपूर्वी अरुणने त्याचा शेवटचा व्हिडीओ पोस्ट केलेला होता.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लोकप्रिय रीलस्टारच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अरुण तुपे (Social media influencer Arun Tupe) याचं काल (10 मार्च) निधन झालं. तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय असलेल्या अरुण तुपेने काही तासांपूर्वीच एक रील शेअर केली होती. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येईल.(Social media influencer Arun Tupe) 

सकाळी साडेदहा वाजता शूटसाठी येणार असल्यानं सिनेमॅटोग्राफरने नेहमीप्रमाणे अरुणला फोन केला. अरूणच्या फोनवरती पलीकडून मित्राने फोन उचलून सांगितलं, 'अरुण आता कधीच पोहोचू शकणार नाही...' सुरुवातीला हा नेहमीचाच चेष्टा वाटली, पण काही क्षणांतच वास्तवाची भयानक जाणीव झाली. खरोखरच, अरुण कधीही न परतीच्या प्रवासाला गेला होता. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्याचे पाय जमिनीवर होते, असा हा युवा कंटेंट क्रिएटर अरुण तुपे याच्या अचानक जाण्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.(Social media influencer Arun Tupe) 

अरुण हा कष्टकरी कुटुंबातून स्वबळावर पुढे आलेला तरुण होता. शेजारी राहणाऱ्या सुलभा पाटील यांनी सांगितलं की, तो अत्यंत गुणी मुलगा होता. बालपणीचा मित्र ऋतुराज आरट याने अरूणबद्दल बोलताना सांगितले की, तो फार मनमिळाऊ होता, त्याने कधीही कोणाचे मन दुखावले नाही. कंटेंट क्रिएटर म्हणून तो नावारूपास आला, तरी त्याचे पाय जमिनीवरच होते. सर्वांना तो मदत करायचा, ज्यांना कंटेंट क्रिएट करायची आवड होती, त्यांना तो शिकवत असे धडे देत होता.

मृत्यूच्या अवघ्या २४ तासांपूर्वी अरुणने त्याचा शेवटचा व्हिडीओ पोस्ट केलेला होता. आकाशवाणी परिसरात एका व्हायरल गाण्यावर त्याने एक रील शूट केली होती. तीच शेअर केली होती. तर काल (मंगळवारी) सकाळी १० वाजता त्याचे एका कॅफेचे प्रमोशनल शूट ठरले होते. सोमवारी रात्री ९:३० वा. सिनेमॅटोग्राफरसोबत अरूणचे बोलणे झाले आणि शूटची वेळ १२ ऐवजी १० वाजता ठरली. सकाळी साडेदहा वाजता सिनेमॅटोग्राफर यांनी अरुणला फोन केला असता, तो फोन त्याच्या मित्राने उचलला व अरुण आपल्याला कायमचा सोडून गेल्याची धक्कादायक बातमी दिली. संपूर्ण सोशल मीडियावर अरुणचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण नेहमीप्रमाणे सकाळी ६ वा. झोपेतून उठला. 'थोडा वेळ परत झोपतो' असे म्हणत त्याने डोळे मिटले, ते कायमचेच. काही वेळाने आईने त्याला उठवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण अरुण प्रतिसाद देत नव्हता. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ क्लिनिकमध्ये नेले. खासगी डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्याची आई शिवणकाम करते तर वडिलांचा साऊंडचा व्यवसाय आहे.

तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण तुपे प्रकरणात शवविच्छेदन अहवालात विश्लेषणासाठी व्हिसेरा जतन करण्यात आला असून, मृत्यूचे कारण राखून ठेवले आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालातही तसे नमूद करण्यात आले असून, अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

फुलंब्रीतील मूळ गावी अरुण तुपेला अखेरचा निरोप

अरूण तुपेच्या मृत्यूमुळे तरुणाईला धक्का बसला. त्यांच्या अंत्ययात्रेत मित्रमंडळी, नातेवाईक, चाहत्यांनी उपस्थित राहून त्याला मंगळवारी सायंकाळी फुलंब्रीतील मूळ गावी अखेरचा निरोप दिला. 

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget