एक्स्प्लोर

युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक

‘युद्धस्य रम्य कथा‘ हे वाक्य आपल्या मनावर इतकं बिंबवलं गेलंय की युद्धात मरणाऱ्या लोकांविषयी आपण असंवेदनशील झालो आहोत. वास्तवात युद्धस्य करूण कथा हे दुखरे सत्य असते, जे आपण स्वीकारत नाही. अशाच एका दुःखद कारुण्याचा हा ब्लॅाग....

तो एक सामान्य लोहार होता. तो काही शूरवीर योद्धा नव्हता ज्याला विविध शस्त्रे चालवता येत होती. सामान्य माणूस असूनही त्यानं असं काही असामान्य कर्तृत्व करून दाखवलं की, त्याच्या मायदेशी बेलारूसमध्ये आजही त्याच्या पुतळ्यापुढे लोक नतमस्तक होतात. त्याच्या स्मारकाचं नाव अगदी विशेष आहे - 'द अनकॉन्कर्ड मॅन' -  शरण न गेलेला माणूस! न झुकलेला माणूस!

22मार्च 1943 रोजी बेलारूसमधील लोगॉईस प्रांतातील मिन्स्क भागातल्या खतीन नामक खेड्यातील सर्व नागरिकांचे नाझी सैन्याकडून शिरकाण करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धात बेलारूसमध्ये हत्याकांड ही सामान्य बाब झाली होती इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं मारली गेली. अधिकृत आकडेवारीनुसार बेलारूसमध्ये 5295 वस्त्या / गावं बेचिराख केली गेली. एकट्या विटबॅक्स भागात 243 गावं अशी होती की ती दोनदा जाळण्यात आली, तर 83 गावं अशी होती की ती तीनदा जाळण्यात आली. तर 22 गावं अशी होती की तीन वेळा जाळून देखील ती पुन्हा उभी राहिली आणि नाझी सैन्याने ती चवथ्यांदा जाळली. 209 शहरांचा विध्वंस करण्यात आला आणि तब्बल 9200 खेड्यांची स्मशाने झाली! 

ना*झी आक्रमकांचा कब्जा असलेल्या तीन वर्षात बेलारूसमधली बावीस लाख तीस हजार माणसं मारली गेली. हा आकडा तिथल्या तत्कालीन लोकसंख्येच्या एक चतुर्थांश होता. युद्धे संपली. युद्धांच्या जखमा सोसलेली ती पिढीदेखील काळाच्या पडद्याआड गेली. रशियाचं विघटन झालं आणि बाजूच्या अनेक राष्ट्रांनी आणखी मोकळा श्वास घेतला. बेलारूसमध्ये काही दशकांनी समृद्धी आली आणि युद्धाच्या झळा अनुभवलेल्या या देशाने शांती आणि संयमाचा पाठपुरावा केला. बेलारूसमधील सर्व हत्याकांडात खतीनचं बेचिराख होणं एक वेगळा संदेश घेऊन आलं. कारण त्या गावातला एकही प्रौढ व्यक्ती यात जीवित राहिला नव्हता, केवळ एक अपवाद होता तो म्हणजे युजिफ (जोसेफ) कामिनेस्की !

कामिनेस्कीच्या खतिन गावावर नाझी सैन्याने हल्ला चढवून बायका पोरींना नासवलं. घरं जाळून टाकली. माणसंही जिवंत जाळली. अनेकांना तोफेने उडवलं. बंदुकांमधून जणू अग्निवर्षाव झाला. कामिनेस्कीने हल्ले परतवून लावले नाहीत पण जमेल त्याचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. सर्व गावकरी मरण पावले असे समजून नाझी सैनिक रात्री उशिरा निघून गेले. मात्र सारे संपले नव्हते, पाच किशोरवयीन मुलं आणि युजिफ कामिनेस्की जिवंत राहिले होते पण त्यासाठी कामिनेस्कीने मोठी किंमत चुकवली होती.  

मध्यरात्र उलटून गेल्यावर बेलारूशियन सैन्य गावात आलं तेंव्हा त्यांनी जे दृश्य पाहिलं ते काळजावर ओरखडे आणणारं होतं. बावन्न वर्षांचा कामिनेस्की गावाच्या वेशीवर निश्चल उभा होता आणि त्याच्या हातात त्याचा कोवळा मुलगा होता, ज्याचा देह छिन्न विच्छिन्न झाला होता. आपल्या कोवळ्या निरागस निष्पाप मुलाचं कलेवर हाती घेऊन ताठ मानेने उभा असलेला कामिनेस्की निडरपणाचं प्रतिक मानला गेला. खतीन गाव पुन्हा वसवलं गेलं नाही कारण गावातलं कुणी उरलंच नव्हतं. 

1969 मध्ये इथे एक स्मारक उभं करण्यात आलं, जिथे कामिनेस्कीचा पुतळा उभारण्यात आला. या स्मारकात 185 थडगी आहेत ज्यावर 185 गावांची नावे लिहिली आहेत जी पुरती नामशेष झाली, ज्यांनी अनन्वित अत्याचार झेलले. इथे कायम स्मशान शांतता असते मात्र दर तीस सेकंदाला इथे बारीक घंटानाद होतो. बेलारूसमधले जितके लोक मारले गेले त्यांच्या संख्येच्या प्रमाणात या घंटानादाचे सूत्र आहे.

बेलारूसच्या जनतेनेही तेंव्हा आपल्यावरील अत्याचारास सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. दोन्हीकडून बंदुका चालल्या मात्र कामिनेस्कीच्या मुलाचा दोष काय होता हे आजवर कुणीच सांगू शकलं नाही. किंबहुना भविष्यात देखील याचं नेमकं आणि खरं उत्तर कुणी देणार नाही खास करून अशी माणसं तर कधीच याचं उत्तर देऊ शकणार नाहीत ज्यांच्या अंगात युद्धाची खुमखुमी असते. आता बेलारूससह अरब जगत अस्वस्थ आहे, संघर्षाच्या नव्या टप्प्यावर उभे आहे.  

हाणा, मारा, कापा, खलास करा, संपवून टाका असं म्हणणं कधीही सोपं असतं मात्र मानवतेसाठी काहीतरी भव्योदात्त निर्माण करा वा तशी निर्मिती करूया असं म्हणणं कायम कठीणच असतं. रिकामटेकडी जनता, निष्क्रिय बेरोजगार तरुण आणि धगधगत्या सीमा हे राजकीय नेतृत्वाचे भांडवल असतं. ही पेटंट गिऱ्हाईकं असतात, यामुळे नेहमी शासकांची गादी बळकट होते आणि जनता भुकेकंगाल होते. मात्र एका पिढीचा सर्वनाश झाल्यावरच जनतेला हे सत्य उमगते कारण युद्धज्वराने त्या जनतेला पुरते ग्रासलेले असते ! 

आपल्या डोक्यावर आपण कुणाला स्वार होऊ द्यायचे हे आपल्या हातात असते मात्र त्यासाठी आपला विवेक जागा असायला हवा नाहीतर आपण स्वतः युजिफ कामिनेस्कीचं जिगर राखलं पाहिजे !    

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget