एक्स्प्लोर

AI स्कॅमवर कॉमेडियन भारती सिंहची आगपाखड; आवाजाचा वापर करुन Slimming products ची विक्री, VIDEO शेअर करुन म्हणाली...

Comedian Bharti Singh Exposes Online Scam: कॉमेडियन भारती सिंहच्या आवाजाचा वापर करून ऑनलाइन स्कॅम केला जात असल्याचा आरोप समोर आला.

Comedian Bharti Singh: स्टार कॉमेडियन भारती सिंह आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.   ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.  दैनंदिन घडणाऱ्या गोष्टी ती व्लॉगद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिनं सोशल मीडियावर  एका स्कॅमबाबत माहिती शेअर केली आहे.  भारतीनं सांगितलं की,  एआयद्वारे तिच्या आवाजाचा वापर करुन, ऑनलाइन स्लिमिंग प्रॉडक्ट्स विकले जात असल्याची माहिती दिली.  यामुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. तिनं आपला संताप व्यक्त केला. 

कॉमेडिअन भारती सिंग सध्या एका नवीन  प्रकारच्या ऑनलाइन घोटाळ्यामुळे चर्चेत आहे.  काही स्कॅमर्स एआयद्वारे तिच्या आवाजाचा वापर करुन स्लिमिंग प्रॉडक्ट्स विकण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी या बनावट जाहिरातीवर विश्वास ठेवला.  दरम्यान, भारतीला या माहिती मिळताच तिनं आपल्या चाहत्यांना सावध केले आहे. तिनं व्हिडिओ शेअर करत ही जाहिरात फेक असल्याचं सांगितलं. 

भारतीनं व्हिडिओत सांगितलं की,  'माझ्या नावाचा वापर करुन स्कॅम केला जात आहे.  चाहते आणि इतर नातेवाईक ही जाहिरात मला शेअर करुन, खरं आहे का? असा प्रश्न उपस्थितीत करतात.  या उत्पादनाचा वापर करुन खरंच वजन कमी होतं का?  असेही प्रश्न विचारले जातात.   तु्म्ही हा प्रॉडक्ट वापरता का? या कंपनीला तुम्ही ओळखता का? असे अनेक प्रश्न विचारतात', असं भारती सिंह म्हणाली. 

या जाहिरातीबाबत भारती म्हणाली, 'मी तुम्हाला सांगू इच्छिते, मी या कंपनीला अजिबात ओळखत नाही. माझ्यासाठी ही फसवणूक आहे.  मला न विचारता, माझ्या परवानगीशिवाय, ते माझ्या नावाचा वापर करुन, एआयद्वारे माझा आवाज बदलून आपले प्रॉडक्ट विकत आहेत. जेव्हा मला लोकांनी हा व्हिडिओ पाठवला, तेव्हा हे प्रकरण उघड झालं', असं  भारती सिंह आपल्या व्हिडिओत म्हणाली.

'लोक माझ्यावर खूप विश्वास ठेवतात.  हा प्रॉडक्ट खरा आहे की नाही, खरेदी करावे की नाही? याबाबत विचारतात.   मला माहित नाही, हा स्कॅम नेमकं कोणते लोक करत आहेत.   जाहिरातीमध्ये वापरलेला आवाज माझा जरी वाटत असला तरी, तो माझा आवाज नाही.  या स्कॅमला बळी पडू नका',  असे आवाहन यावेळी भारतीने केले. 

'माझा चेहरा तिथे वापरला गेला असेल,  पण हा माझा आवाज नाही.  हा जाहिरातीचा व्हिडिओ माझ्या आईनेही पाठवला होता.  हे खरे आहे की नाही? हे देखील तिनं विचारलं होतं. ते खोटे आहे', असं अभिनेत्रीनं स्पष्ट केलं.  तिनं आपला कंपनीशी आणि ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या उत्पादनांशी काहीही संबंध नसल्याचंही  स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
Sushmita Mukherjee: 'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget