Box Office Collection : मायबाप प्रेक्षकांचे प्रेम पाहून रजनीकांत, सनी देओल भारावले; 'Gadar 2' अन् 'Jailer'ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!
Bollywood Movies : 'गदर 2' आणि 'जेलर' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत.
Sunny Deol Gadar 2 Rajinikanth Jailer Akshay Kumar OMG Box Office Collection : दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत (Rajinikanth), बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेलचा (Ameesha Patel) 'गदर 2' (Gadar 2) तसेच बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हे तीन सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहेत. हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहेत.
रजनीकांतच्या 'जेलर'चा जगभरात डंका! (Jailer Box Office Collection)
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा जगभरात चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने 48.35 कोटींची कमाई केली होती. मोठा वीकेंड, स्वातंत्र्यदिनी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. रिलीजच्या आठ दिवसांत भारतात या सिनेमाने 235.65 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 411.7 कोटींचं कलेक्शन जमवलं आहे.
रजनीकांतवर भारी पडलाय सनी देओल; जाणून घ्या 'गदर 2'ची कमाई (Sunny Deol Gadar 2 Box Office Collection)
सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) अभिनित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत नव-नवे रेकॉर्ड हा सिनेमा आपल्या नावे करत आहे. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने 283.35 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 338.5 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा 'गदर 2' हा सिनेमा ठरला आहे. आता हा सिनेमा शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'चा (Pathaan) रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
खिलाडी कुमारच्या 'ओएमजी 2'चं कलेक्शन जाणून घ्या...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने 84.72 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचं कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.
मनोरंजनसृष्टी बहरली...
वेगवेगळ्या धाटणीचे विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भारतीय मनोरंजनसृष्टी बहरलेली आहे. आता रजनीकांतचा 'जेलर' (Jailer), सनी देओल आणि अमिषा पटेलचा 'गदर 2' (Gadar 2) आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे एकीकडे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना दुसरीकडे अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याचा 'घुमर' (Ghoomer) हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
हिंदी सिनेमांसह मराठी सिनेसृष्टीतही आनंदाचे वातावरण आहे. 'सैराट' (Sairat) आणि 'वेड' (Ved) या सिनेमांनंतर आता 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमाही रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल. आता हा मराठीतला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. तर नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) 'सैराट' (Sairat) हा सिनेमा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) आणि चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांचा 'सुभेदार' (Subhedar) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होईल.
संबंधित बातम्या