Box Office Collection : सनी देओल, रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; जाणून घ्या गदर-2, ओएमजी 2 आणि जेलरचे कलेक्शन...
Box Office Collection : जाणून घेऊयात जेलर, गदर-2 आणि ओएमजी-2 या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Box Office Collection : गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक थिएटमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटमध्ये रिलीज झाला. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांचा गदर-2 (Gadar 2) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ओएमजी-2 (OMG 2) हे चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आले. गदर-2 (Gadar 2) आणि ओएमजी-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्यानंतर कोणता चित्रपट जास्त कलेक्शन करेल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. जाणून घेऊयात जेलर, गदर-2 आणि ओएमजी-2 या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...
'गदर 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन-
शुक्रवारी (11 ऑगस्ट ) कमाई - 40.10 कोटी रुपये
शनिवारी (12 ऑगस्ट ) - 43.08 कोटी
रविवारी (13 ऑगस्ट ) -51.70 कोटी
सोमवारीची कमाई (14 ऑगस्ट) - 38.70 कोटी
मंगळवारी (15 ऑगस्ट) - 55.50 कोटी
बुधवारी (16 ऑगस्ट) - जवळपास 33.50 कोटी
गदर 2 चे सहा दिवसांचे एकूण कलेक्शन - रु. 262.48 कोटी
ओएमजी-2 चे कलेक्शन-
रिपोर्टनुसार, चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी (16 ऑगस्ट) 7.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'OMG 2' चे 6 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 80.02 कोटी रुपये झाले आहे
तसेत, चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनने 100 कोटी म्हणजेच 110 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
रजनीकांत यांच्या 'जेलर' ची कमाई-
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या सातव्या दिवशी जेलर चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे.
रिपोर्टनुसार, चित्रपटाने 7 व्या दिवशी 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मंगळवारी स्वातंत्र्य दिनाला या चित्रपटाने 36 कोटींचे कलेक्शन केले होते.
रजनीकांतच्या जेलरची सात दिवसांत भारतातील एकूण कमाई 200 कोटींच्या पुढे गेली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 225.65 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'जेलर' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 400 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा ओलांडला आहे.
जेलरची स्टार कास्ट
रजनीकांत यांच्यासोबतच मोहनलाल, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
गदर-2 मधील कलाकार
गदर-2 चित्रपटामध्ये अमिषा पटेल आणि सनी देओल यांच्यासोबतच लव्ह सिन्हा,उत्कर्ष शर्मा, सिमरित कौर या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
ओएमजी-2 मध्ये 'या' कलकारांनी साकारली भूमिका
अक्षय कुमार,यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी ओएमजी-2 या चित्रपटामध्ये या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानकाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: