एक्स्प्लोर

Vaathi OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज होणार धनुषचा 'वाथी'; जाणून घ्या कुठे प्रदर्शित होतोय हा चित्रपट

Vaathi : 'वाथी' हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Dhanush Vaathi OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या (Dhanush) 'वाथी' (Vaathi) या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 

'वाथी' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? (Vaathi OTT Release)

'धनुष'चा प्रत्येक सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. त्याचे सिनेमे रिलीज होण्याआधीपासूनच चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी धनुषचा 'वाथी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलीच कमाई केली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीच 'वाथी' या सिनेमाचा समावेश आहे. आता बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर 'वाथी' हा सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला 'वाथी' हा सिनेमा आता 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. येत्या 17 मार्चपासून हा सिनेमा प्रेक्षक घरबसल्या पाहू शकतात. प्रेक्षकांसह परीक्षकांनीदेखील या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

'वाथी' या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या सिनेमात धनुषने प्रोफेसरची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 90 च्या दशकातील शिक्षण व्यवस्थेवर आधारित आहे. या सिनेमातील धनुषच्या भूमिकेचंदेखील प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'वाथी' या सिनेमाआधी धनुषच्या 'थिरुचित्रम्बलम' (Thiruchitrambalam) या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यश आले होते. 

'वाथी'ने पार केला 100 कोटींचा टप्पा

'वाथी' या सिनेमाने जगभरात 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. वेंकी एटलुरीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. धनुषसोबत या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री संयुक्ता मेननदेखील मुख्य भूमिकेत आहे. धनुष आणि संयुक्ताची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तर दुसरीकडे या सिनेमात समुथिरकानी नकारात्मक भूमिकेत आहे. धनुषसह या सिनेमात साई कुमार, तनिकेला भरणी, समुथिरकानी, मधु थोटापल्ली, नर्रा श्रीनिवास आणि हाइपर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सीथारा एंटरटेनमेन्टच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

Dhanush Birthday : लोक म्हणत होते रिक्षावाला, आज हॉलिवूडमध्ये करतोय काम; कोट्यवधींचा मालक असणाऱ्या धनुषचं खरं नाव माहितीये?

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget