एक्स्प्लोर
1760 वेळा टीव्हीवर दिसणाऱ्या 'सूर्यवंशम'ला 17 वर्ष पूर्ण

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने #17YearsOfSooryavansham हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्डिंग असून बिग बी यांनीही आठवणी जागवल्या आहेत.
सूर्यवंशम हा सिनेमा 1999 मध्ये रिलीज झाला होता. वडिल भानुप्रताप यांच्या इच्छेविरोधात हिरा हा तरुण लग्न करतो. वडिलांच्या दृष्टीने नालायक असलेला हिरा नंतर वडिलांचं मन कसं जिंकतो, ही या सिनेमाची कथा. वडिल आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत अमिताभ बच्चन दिसले होते.
1997 मध्ये रिलीज झालेल्या सूर्यवंशम याच नावाच्या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. आजही हा सिनेमा अनेक जण पाहतात, अनेकांच्या काळजाला या सिनेमाने हात घातला आहे, अशा भावना बिग बींनी ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/SrBachchan/status/733736012350783488
ई. व्ही. व्ही. सत्यनारायण दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जयसुधा, दिवंगत अभिनेत्री सौंदर्या, रचना बॅनर्जी, अनुपम खेर, कादर खान, बिंदू यासारखे कलाकार होते.
सेट मॅक्स या वाहिनीवर सूर्यवंशम अनेक वेळा दाखवला जातो. यावरुन सोशल मीडियावर बरेच जोक्स व्हायरल झाले आहेत. त्यामुळे 17 व्या वर्षपूर्तीनिमित्त ट्विटराईट्सच्या सर्जनशीलतेला उधाण आलं आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















