एक्स्प्लोर

सोनाली बेंद्रेच्या निधनाच्या अफवांवर पती गोल्डी बहल संतापले

सोनालीच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा करु नका, असं आवाहन पती गोल्डी बहल यांनी ट्विटरवरुन केलं आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन झाल्याची अफवा पसरवणारं ट्वीट भाजप आमदार राम कदम यांनी केल्यानंतर सोनालीचे पती गोल्डी बहल यांचा संताप झाला आहे. गोल्डी यांनी सोनालीच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा करु नका, असं आवाहन ट्विटरवरुन केलं आहे. 'सोशल मीडियाचा वापर सर्वांनी जबाबदारीने करावा, असं नम्र आवाहन आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पसरवू नका. अफवा ज्या व्यक्तीशी निगडीत आहेत, त्यांच्या भावना विनाकारण दुखवू नका. धन्यवाद' असं ट्वीट गोल्डी बहल यांनी केलं आहे. मुलींबाबत बेताल वक्तव्य केल्यानंतर राम कदम यांनी आणखी एक चूक केली. अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन झाल्याची अफवा त्यांनी ट्वीट केली. त्यानंतर सोशल मीडियावर राम कदमांची खिल्ली उडवली जात होती. राम कदम यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक ट्वीट करण्यात आलं. "हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड.. त्यांचे अमेरिका येथे निधन झाले आहे...भावपूर्ण श्रद्धांजली," असं हे ट्वीट होतं, जी खरं तर निव्वळ एक अफवा होती. सोनाली बेंद्रेच्या निधनाच्या अफवांवर पती गोल्डी बहल संतापले ही अफवा असल्याचं समजल्यानंतर दहा मिनिटांतच राम कदम यांनी पहिलं ट्वीट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत अनेक जणांनी त्याचे स्क्रीनशॉट काढले होते. "सोनाली बेंद्रे यांच्या निधनाची अफवा होती. गेल्या दोन दिवसांपासून ती अफवा पसरत होती. मी त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो," असं राम कदमांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं. सोनाली बेंद्रेच्या निधनाच्या अफवांवर पती गोल्डी बहल संतापले सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. हायग्रेड कॅन्सरचा साधा अर्थ वेगाने पसरणारा कॅन्सर. सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget