Viral Video : शिल्पा शेट्टीने शेअर केलं नवं वर्कआऊट रुटीन, व्हिडीओ होतोय व्हायरल
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपले नवीन वर्कआऊट इन्स्टाग्रामवर शेअर केलंय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

नवी दिल्ली : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपल्या आरोग्याच्या बाबतीत प्रचंड जागरुक आहे. तिने आपल्या चाहत्यांनाही त्या बाबत अनेकवेळा मार्गदर्शन केलंय. आताही तिने आपला वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर केलाय. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण कसं सदृढ राहायचं हे सांगितलं आहे. ती पाळत असलेलं हे रुटीन सर्वांनी पाळावं असंही तिने आवाहन केलं आहे. शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या ओपन आणि स्क्वाट वर्क आऊट सेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती म्हणते की, "मजेदार व्हिडीओसाठी केवळ रविवारच का निवडायचा? चला, आता सोमवारीही एक मजेदार अनुभव घेऊया. काहीतरी नवीन करणं मला पसंत आहे आणि ते मला आव्हान देतं. आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत की त्यांच्यासाठी लॉकडाऊनचा काळ खूप कठीण आहे. या लॉकडाऊनमध्ये आलेली एकरसता तोडण्यासाठी एक उपाय आहे, आपला मेंदू आणि स्नायूंना ओपन करा. आज आपण ओपन आणि क्लोज स्क्वाटचे आव्हान घेऊयात."
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी सांगते की, हा वर्कआऊट कार्डिओ-रिस्पेरेटरी एनड्युरेंस, शरीराच्या खालच्या भागातले सर्व मांस पेशी, खांदे, गती, चपळता, मस्तिष्क आणि हाता-पायांचे समन्वय यासाठी उपयोगी पडतात.
शिल्पा शेट्टी आपल्या आगामी हंगामा 2 या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत परेश रावल आणि मीजान जाफरी हे देखील दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :























