CM Uddhav - PM Modi Meeting LIVE : मुख्यमंत्री आणि पंतप्रधान भेटीची टाईमलाईन
CM Uddhav - PM Modi Meeting LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नी ही भेट आहे. या दौऱ्याविषयीचे सर्व अपडेट्स....
Background
CM Uddhav - PM Modi Meeting LIVE : मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. आज सकाळी ही भेट होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहे.
मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा!
- सकाळी 7 वाजता मुंबईहून विमानाने दिल्लीसाठी रवाना होणार
- सकाळी 9 वाजता दिल्ली विमानतळावर दाखल होणार
- सकाळी 9.45 वाजता महाराष्ट्र सदन इथे आगमन
- सकाळी 10.15 वाजता नवी दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासकडे रवाना
- सकाळी 10.30 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी आगमन होणार
- सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक
- बैठकीनंतर सोयीनुसार मुंबईकडे विमानाने प्रयाण
संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून आंदोलनाची हाक
शिवराज्यभिषेकदिनी म्हणजेच 6 जून रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची हाक दिली. येत्या 16 जून पासून राजर्षि शाहू महाराज यांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या घोषणेनंतर पुढचे पाऊल म्हणजे महाविकासआघाडीने पुन्हा एकदा हा चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला आहे. एकीकडे भाजपकडून रणनिती आखली जाते तर दुसरीकडे महाविकास आघाडी भाजपच्या नेत्यांना भेटून आरक्षणाचा तिढा सोडवण्याची विनंती करणार आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "मी 2007 पासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. माझा लढा हा 70 टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. मराठा समाज हा सामाजिक मागास नाही, म्हणून आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्याचं सर्वांनाच दु:ख झालं. आता कोण चुकले कोण बरोबर याच्यावरुन मागचे सरकार आणि आताचे सरकार यांच्यात वाद सुरु आहे. या वादाशी आम्हाला काही घेणं-देणं नाही, मराठा समाजाला आरक्षण कसं देणार ते सांगा?"
पालघर जिल्ह्यात 9 ते 12 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला
पालघर जिल्ह्यात 9 ते 12 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला, जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कडून प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना सूचना देऊन दवंडी पिटवून नागरिकांना सतर्क राहण्यासाठी माहिती देण्यासाठी केल्या सूचना, तालुका स्तरावरून अंमलबजावणी सुरू
एका महिलेची पतीविरोधात तक्रार, त्यानंतर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची पतीची तक्रार
एका महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार केल्यानंतर आपल्यला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची महिलेच्या पतीची पोलिसांविरोधात तक्रार, सांगली जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्यातील प्रकार, खानापूर तालुक्यातील करंजे मधील एका महिलेने पती विरोधात तोंडी तक्रार दिली, या तक्रारी नंतर खानापूर पोलीस ठाण्यात पती पोपट नारायण माने यास रात्री उशिरा चौकीत नेऊन बेदम मारहाण केल्याची माने याची तक्रार
























