Sher Shivraj : अफजलखानाच्या वधाचा थरार आता घरबसल्या अनुभवा; अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'शेर शिवराज' प्रदर्शित
Sher Shivraj : 'शेर शिवराज' हा सिनेमा प्रेक्षक आता घरबसल्या पाहू शकतात. नुकताच हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.
Sher Shivraj : 'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता दिग्पाल लांजेकरांनी सिनेमासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. दिग्पाल लांजेकरांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत लिहिले आहे, "आता घरोघरी छत्रपती शिवरायांचा शिवप्रताप! अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला 'शेर शिवराज' सिनेमा आता प्राइम व्हिडीओवर पाहू शकता".
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड सिनेमांच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टकातील 'शेर शिवराज' हे चौथे चित्रपुष्प आहे. शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या सिनेमात घडतं. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण 'शेर शिवराज' या सिनेमात दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.
चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत
'शेर शिवराज' सिनेमात चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर अफजलखानाच्या भूमिकेत मुकेश ऋषी दिसणार आहेत. जिजाऊ आऊसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर सुभेदार तानाजी मालुसरे, दिग्पाल लांजेकर बहिर्जी नाईक, वर्षा उसगांवकर बडी बेगम, समीर धर्माधिकारी कान्होजी जेधे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे केसरच्या भूमिकेत तर अक्षय वाघमारे पिलाजी गोळे, विक्रम गायकवाड सरनोबत नेताजी पालकर, आस्ताद काळे विश्वास दिघे, वैभव मांगले शिवाजी महाराजांचे वकील गोपीनाथ बोकील, सुश्रुत मंकणी येसाजी कंक, दीप्ती केतकर मातोश्री दिपाईआऊ बांदल, माधवी निमकर मातोश्री सोयराबाई राणीसरकार, ईशा केसकर मातोश्री सईबाई राणीसरकार, रिशी सक्सेना फाझल खानची तर निखील लांजेकर नरवीर जीवा महाले, बिपीन सुर्वे सर्जेराव जेधे यांची भूमिका साकारणार आहे.
कुठे पाहता येईल? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
संबंधित बातम्या