Sher Shivraj : शिवरायांची कीर्ती पुन्हा दुमदुमणार! फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर 'शेर शिवराज' येणार रुपेरी पडद्यावर
Digpal Lanjekar : दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा 'शेर शिवराज' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sher Shivraj : 'पावनखिंड' (Pawankhind) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 18 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाला आहे. बॉक्सऑफिसवरदेखील सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. अनेक सिनेमांगृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्डदेखील झळकत आहे. लवकरच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा 'शेर शिवराज' (Sher Shivraj) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवराज अष्टक फिल्म सीरिज ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित असलेली आठ सिनेमांची सीरिज आहे. त्यातले फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड प्रदर्शित झाले आहेत. लवकरच 'शेर शिवराज' सिनेमादेखील प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्राबाहेरदेखील 'पावनखिंड' सिनेमाची यशस्वी घौडदौड
'पावनखिंड' सिनेमा महाराष्ट्राबाहेरदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. दिल्ली, गोवा, हैद्रराबाद, गुजरात, कर्नाटक आणि चेन्नईत या सिनेमाचे शो लागले आहेत. 'पावनखिंड' सिनेमा महाराष्ट्राबाहेरील सिनेप्रेमींच्या पसंतीस पडत आहे.
संबंधित बातम्या
Bheemla Nayak Trailer : 'भीमला नायक' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पवन कल्याण दिसणार डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
Prashant Damle : 'माझी व्यथा...'; प्रशांत दामलेंची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
Allu Arjun : पुष्पानंतर 'या' धमाकेदार चित्रपटांमधून अल्लू अर्जुन येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; पाहा कोणते चित्रपट होणार रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha