Brahmastra : आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख खानची एन्ट्री; ट्रेलर आऊट
Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना शाहरुख खानची झलक पाहायला मिळणार आहे.
Shahrukh Khan In Brahmastra : बॉलिबूडचा बादशाह शाहरुख खानचे (Shahrukh Khan) चाहते शाहरुखला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. किंग खान आता अयान मुखर्जीच्या (Ayaan Mukherji) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना शाहरुखची झलक पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
'ब्रह्मास्त्र' सिनेमात शाहरुख खान एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात किंग खान महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात शाहरुखची झलक प्रेक्षकांना 15-20 मिनिटं पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने सिनेमाचे शूटिंग पूर्ण केलं असून प्रेक्षकांप्रमाणे किंग खानदेखील सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय दिसणार आहेत.
View this post on Instagram
9 सप्टेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित
‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची घोषणा ऑक्टोबर 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये त्याचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या सिनेमाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या चित्रपटामधीस केसरीया या गाण्याची झलक आयान मुखर्जीनं शेअर केली होती. या गाण्याच्या टीझरमध्ये रणबीर आणि आलियाचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. सध्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
शाहरुख खानचे आगामी सिनेमे
शाहरुख खान लवकरच 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. या सिनेमात शाहरुख दीपिकासोबत दिसणार आहे. तसेच राजकुमार हिरानीच्या डंकी सिनेमातदेखील शाहरुख दिसणार आहे. त्यासोबत एटलीच्या जवान सिनेमात शाहरुख नयनतारासोबत दिसणार आहे.
संबंधित बातम्या























