Shah Rukh Khan : किंग खानच्या चित्रपटात दिसणार पुण्यातील 'हे' मेट्रो स्टेशन; व्हिडीओ तुफान व्हायरल
पुणे (Pune) मेट्रोच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Shah Rukh Khan : प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 3 एप्रिल रोजी 'जवान' (Jawan) या त्याच्या आगामी चित्रपटचा टीझर रिलीज केला. या टीझरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले पण आता हा टीझर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. पुणे (Pune) मेट्रोच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा पुण्यातील संत तुकाराम नगर या मेट्रो स्थानकावर बसलेला दिसत आहे.
पुणे मेट्रोच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या टीझरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाच्या जाहिरातीमध्ये #पुणेमेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकाची ची झलक' असं लिहिलेलं दिसत आहे. पुणे मेट्रोच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. 'शाहरुखचा चित्रपट पुणे मेट्रोमध्ये चित्रित झालेला आहे याचा आनंद आहे', अशी कमेंट एका युझरनं केली आहे.
जवान चित्रपटाबद्दल शाहरुखनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, “हा अनोखा चित्रपट बनवण्याचे श्रेय अॅटलीला जाते, हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता कारण मला अॅक्शन चित्रपट आवडतात!” जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियवर शाहरुखनं जवान चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. टीझर शेअर करुन शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “2023 असणार अॅक्शन पॅक! 2 जून 2023 रोजी तुमचे मनोरंजन करण्यासाठी 'जवान' चित्रपट रिलीज होतो.' एक मिनिट 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये , शाहरुख त्याच्या डोक्यावर आणि हातावर पट्टी बांधलेला, हातात मशीन गन धरुन एका गुप्त ठिकाणी बसलेला दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून त्याचे चाहते थक्क झाले.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
