एक्स्प्लोर
Advertisement
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू, रुग्णालयात दाखल
'मला शांत बसून आत्मचिंतनासाठी फार कमी वेळ मिळतो. मात्र आता जबरदस्ती विश्रांती घ्यावी लागत आहे. मी रुग्णालयात असून वेगाने रिकव्हरी होत आहे' असं शबाना आझमी यांनी सांगितलं.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शबाना आझमींना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्दी-खोकला झाल्यामुळे त्या तपासणीसाठी गेल्या होत्या, त्यावेळी चाचणी केल्यानंतर शबाना यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं निदान झालं.
हॉस्पिटलाईज झाल्यामुळे मला विसाव्यासाठी वेळ मिळत आहे, अशी प्रतिक्रिया शबाना आझमी यांनी दिली आहे. 'मला शांत बसून आत्मचिंतनासाठी फार कमी वेळ मिळतो. मात्र आता जबरदस्ती विश्रांती घ्यावी लागत आहे. मी कुठल्याही डुकराच्या संपर्कात नाही आले. मी रुग्णालयात असून वेगाने रिकव्हरी होत आहे' असंही शबाना आझमींनी सांगितलं.
शबाना आझमी नुकत्याच जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला गेल्या होत्या.
शबाना आझमी या प्रसिद्ध गीतकार कैफी आझमी यांच्या कन्या, तर गीतकार जावेद अख्तर यांच्या पत्नी आहेत. 1974 साली श्याम बेनेगल यांच्या 'अंकुर' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय अमर अकबर अँथनी, किस्सा कुर्सी का, परवरिश, स्वामी, स्पर्श, थोडीसी बेवफाई अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत.
अर्थ, खंदार आणि पार या सिनेमांसाठी त्यांना 1983 ते 1985 मध्ये सलग तीन वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. नुकत्याच त्या 'नीरजा' चित्रपटात झळकल्या होत्या.
शबाना आझमी यांनी राजकारणातही एन्ट्री घेतली होती. 1997 साली त्या राज्यसभेवर निवडून आल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement