एक्स्प्लोर
Advertisement
ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं आज निधन झालं. वृद्धापकाळाने सुलभा देशपांडे यांनी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 80 वर्षांच्या होत्या.
मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे अवघ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सुलभा देशपांडे यांच्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. शांतता! कोर्ट चालू आहे, चौकट राजा या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मागील एक-दोन वर्षात आलेल्या विहीर, हापूस या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं.
मराठीच नाही तर आदमी खिलौना है, गुलाम-ए-मुस्तफा, विरासत या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी होत्या.
सुलभा देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली. सुलभा देशपांडे एक चांगल्या कलाकार तर होत्याच, शिवाय एक अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व होतं, अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने श्रद्धांजली.
सुलभा देशपांडे यांची उणीव केवळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर सिनेमागृह आणि टीव्हीमध्ये देखील भासेल. त्यांचे चाहते आणि कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/739117028691181568
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
Advertisement