एक्स्प्लोर

Seema Haider: सीमा हैदरने दिल्या ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा; चित्रपटाची ऑफर नाकारली

Seema Haider: सध्या सीमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Seema Haider: पाकिस्तानची  सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena) या  जोडप्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. सीमा आणि सचिनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सीमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देताना दिसत आहे. 

सीमा ही सीमा हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी झाल्याचं पहायला मिळत आहे. सीमाने रविवारी (13 ऑगस्ट) तिचे वकील एपी सिंह आणि सचिन यांच्यासह नोएडा येथे तिरंगा फडकावला.  सीमा आणि सचिन यांनी तिरंगा फडकवताना 'भारत माता की जय'  या घोषणा दिल्या, असं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी सीमाचे वकील एपी सिंह यांनी सांगितले की, सीमा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार नाही आणि तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची ऑफर देखील नाकारली आहे.

सीमाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’ या घोषणा देताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

सीमा हैदरला बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची ऑफर आल्याची चर्चा सुरु होती. हे सर्व नाटक त्वरित बंद करा, नाहीतर मनसेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा मनसे (MNS) नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी दिला. अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत स्थान मिळू नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पाकिस्तानी महिला सीमा हैदर सध्या भारतात आहे. ती ISI एजंट असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. आमच्या चित्रपटसृष्टीतील काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी सीमा हैदरला अभिनेत्री बनवण्याचा प्रयत्न करत आहेत." आता सीमानं चित्रपटाची ऑफर  नाकारली आहे, अशी माहिती तिच्या वकिलांनी दिली आहे.

 सीमा आणि सचिन यांची ओळख PUBG या गेमिंग अॅपच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली, असं म्हटलं जात आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Seema Haider: 'हे सगळं बंद करा, नाहीतर...'; सीमा हैदरवर बनत असलेल्या चित्रपटावरुन मनसेचा इशारा

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget