एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Seema Haider: 'हे सगळं बंद करा, नाहीतर...'; सीमा हैदरवर बनत असलेल्या चित्रपटावरुन मनसेचा इशारा

Seema Haider Movie: सीमा आणि सचिन मीना 2019 मध्ये ऑनलाईन PUBG गेम खेळताना संपर्कात आले. या दोघांच्या लव्ह स्टोरीवर बनत असलेल्या चित्रपटात सीमा हैदरही काम करत आहे.

MNS Warned Seema Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला मनसे नेते अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे. सीमा हैदर आणि सचिन मीना (Sachin Meena) यांच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट बनवला जात आहे, ज्यामध्ये सीमा हैदर देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे. परंतु हे सर्व नाटक त्वरित बंद करा, नाहीतर मनसेच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा मनसे (MNS) नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी दिला आहे.

सीमा हैदर (Seema Haider) तिचा प्रियकर सचिनला भेटण्यासाठी पाकिस्तानातून (Pakistan) अवैधरित्या भारतात आली आहे.

सीमा हैदरने सर्व नाटक बंद करावं, अन्यथा मनसेकडून कारवाईला सामोरं जावं, असा कडक इशारा मनसे नेते अमय खोपकर यांनी शनिवारी (12 ऑगस्ट) दिला. या दोघांच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट निर्माते अमित जानी 'कराची टू नोएडा' हा चित्रपट बनवत आहेत, ज्याचे शूटिंग सुरू करण्यात आलं आहे.

सीमा हैदरच्या चित्रपटाला मनसेचा विरोध

अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत स्थान मिळू नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पाकिस्तानी महिला सीमा हैदर सध्या भारतात आहे. ती ISI एजंट असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. आमच्या चित्रपटसृष्टीतील काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी सीमा हैदरला अभिनेत्री बनवण्याचा प्रयत्न करत आहेत."

हे तमाशे ताबडतोब थांबवा - अमेय खोपकर

मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले, या देशद्रोही लोकांना लाज कशी वाटत नाही? असे तमाशे ताबडतोब बंद करा, अन्यथा मनसेचा धडक कारवाईसाठी सज्ज राहा. ऐकलं नाही, तर राडा होईल असा जाहीर इशारा मनसेने दिला आहे.

सीमा-सचिनवर बनतोय चित्रपट

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सीमा 'कराची टू नोएडा'साठी ऑडिशन देताना दिसली होती. चित्रपटाचे निर्माते अमित जानी म्हणाले की, "आम्ही जगाला सांगू इच्छितो की PUBG खेळताना ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली, सीमा भारतात कशी आणि का आली? हे आम्हाला आमच्या चित्रपटातून सांगायचं आहे आणि म्हणून आम्ही सीमा हैदरबद्दल माहिती गोळा करत आहोत.

पबजी खेळताना झाली होती भेट

पाकिस्तानी महिला सीमा हैदरने सांगितल्याप्रमाणे, कोरोना काळात PUBG गेम खेळताना ग्रेटर नोएडातील रबुपुरा भागात राहणाऱ्या 22 वर्षीय सचिन मीनाच्या प्रेमात सीमा पडली. सीमा आधीच विवाहित होती आणि तिच्यासोबत तिची चार मुलंही भारतात आली आहेत. सीमा आणि सचिनलाही बेकायदेशीरपणे भारतात आल्याबद्दल अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर दोघांची जामिनावर सुटका झाली आहे.

हेही वाचा:

Film On Seema Haider And Sachin: रुपेरी पडद्यावर उलगडणार सीमा आणि सचिनची लव्ह स्टोरी; ‘कराची टू नोएडा’ च्या ऑडिशनला सुरुवात, व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Embed widget