(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sara Ali Khan: 'ज्या भक्तिभावाने मी महाकालला जाईन त्याच भक्तीने मी अजमेर शरीफला जाणार'; ट्रोल करणाऱ्यांना सारानं दिलं सडेतोड उत्तर
काही दिवसांपूर्वी सारानं (Sara Ali Khan) महाकाल देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर साराला अनेकांनी तिला ट्रोल केले. आता सारानं या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही हे सध्या तिच्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. काही दिवसांपूर्वी सारा आणि अभिनेता विकी कौशल हे लखनौ येथील शिव मंदिरात गेले होते. यावेळी सारा आणि विकी यांनी शिव मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर सारा ही मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात गेली. त्यावेळी सारानं महाकाल देवाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली आहे. त्यानंतर साराला अनेकांनी तिला ट्रोल केले. आता सारानं या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणाली सारा?
सारानं मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर सोशल मीडियावर काही जणांनी तिला ट्रोल केलं. याबाबत साराला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. तेव्हा सारा म्हणाली, 'मी माझे काम खूप गांभीर्याने करते. मी लोकांसाठी काम करते. तुम्हाला माझे काम आवडत नसेल तर मला वाईट वाटेल पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मी ठरवेल. ज्या भक्तिभावाने मी बंगला साहिब किंवा महाकालला जाईन त्याच भक्तीने मी अजमेर शरीफला जाणार आणि मी तिथे जात राहीन. लोकांना जे म्हणायचंय ते म्हणू देत, मला काही अडचण नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणी गेल्यावर जी ऊर्जा जाणवते, ती ऊर्जा तुम्हाला आवडली पाहिजे. माझा ऊर्जेवर विश्वास आहे.' सारानं दिलेल्या या उत्तराचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.
#WATCH | Indore, Madhya Pradesh | When asked about internet trolling after her visit to Mahakal Temple in Ujjain, actress Sara Ali Khan says, "...I take my work very seriously. I work for people, for you. I would feel bad if you don't like my work but my personal beliefs are my… pic.twitter.com/ffXdurUCDY
— ANI (@ANI) May 31, 2023
सारा आणि विकी यांच्या 'जरा हटके जरा बचके' हा विकी आणि साराचा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विकी आणि सारासोबतच या चित्रपटात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sara Ali Khan: सारा अली खाननं घेतलं महाकाल देवाचं दर्शन; व्हिडीओ व्हायरल