Happy Birthday Sanjeev Kumar : ‘ड्रीम गर्ल’ने लग्नाला नकार दिला अन् आजन्म अविवाहित राहिले संजीव कुमार!
Sanjeev Kumar Birth Anniversary : ‘शोले’ चित्रपटाचा विषय निघाला की, त्यात ‘ठाकूर’ ही भूमिका साकारणारे अभिनेते संजीव कपूर (Sanjeev Kumar) यांचा चेहरा लगेच डोळ्यासमोर येतो.
Sanjeev Kumar Birth Anniversary : ‘शोले’ चित्रपटाचा विषय निघाला की, त्यात ‘ठाकूर’ ही भूमिका साकारणारे अभिनेते संजीव कपूर (Sanjeev Kumar) यांचा चेहरा लगेच डोळ्यासमोर येतो. अभिनेते संजीव कुमार यांचा जन्म 9 जुलै 1938ला सुरात येथे झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव हरिहर जेठालाल जरीवाला असे होते. नाटकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारे अभिनेते संजीव कुमार यांची पुढे अवघ्या मनोरंजन विश्वाला आपल्या अभिनयाने भुरळ घातली.
संजीव कुमार यांनी आपला अभिनय प्रवास रंगभूमीपासून सुरू केला होता. बालपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ते सुरुवातीला 'इप्टा' आणि नंतर इंडियन नॅशनल थिएटरमध्ये सामील झाले. 1960मध्ये 'हम हिंदुस्तानी' या चित्रपटाद्वारे त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. हा त्यांचा पहिलावहिला बॉलिवूड चित्रपट होता. यानंतर त्यांनी ‘आंधी’, ‘शोले’, ‘अनामिका’, ‘कोशिश’, ‘अंगूर’, ‘खिलौना’, ‘उलझन’, ‘नौकर’, ‘मौसम’, ‘त्रिशूल’, ‘जानी दुश्मन’, ‘नमकीन’, ‘पति पत्नी और वो’, ‘हीरो’, ‘शतरंज के खिलाड़ी’, ‘अनोखी रात’, ‘दासी’, ‘अनहोनी’, ‘सत्यकाम’ असा एकापेक्षा एक हिट चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
‘ड्रीम गर्ल’ने दिला लग्नाला नकार!
‘सीता और गीता’ या चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते संजीव कुमार यांची जोडी झळकली होती. या चित्रपटाच्या सेटवर पहिल्याच नजरेत ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. संजीव कुमार यांच्या प्रेमाच्या चर्चा हेमा मालिनी यांच्या घरापर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र, हेमा मालिनी यांच्या आईने या लग्नाला नकार दिला. हेमा मालिनी यांनी आपल्या आईचा निर्णय स्वीकारला. मात्र, यामुळे संजीव कुमार कोलमडून गेले. त्यांनी पुढे आयुष्यभर लग्नचं केले नाही.
सतत वाटायची मृत्यूची भीती!
हेमा मालिनी यांचा नकार मिळाल्यामुळे त्यांनी पुढे कधीच लग्नाचा विचार केला नाही. मात्र, यासोबतच त्यांच्या लग्न करण्यामागे आणखी एक कारण सांगितले जाते. अभिनेते संजीव कुमार यांना सतत मृत्यूची भीती वाटायची. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना त्याला कारणीभूत होत्या. संजीव कुमार यांचे वडील 10 वर्षांचे असताना त्यांचे आजोबा देवाघरी गेले. तर, स्वतः संजीव कुमार ज्यावेळी 10 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांच्या वडिलांचे देखील निधन झाले. यामुळे जर, आपल्याला मुलं झाली आणि ती 10 वर्षांची झाली की आपला मृत्यू होणार ही भीती त्यांच्या मनात होती. भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या मुलाला दत्तक घेतले. योगायोग म्हणजे तो मुलगा देखील 10 वर्षांचा झाला, तेव्हा संजीव कुमार यांचे निधन झाले.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या