Sana Khan : बोल्डनेस सोडून का परिधान केला हिजाब? अभिनेत्री सना खान म्हणते...
Sana Khan : नेहमीच आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी सना अचानक धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेऊन हिजाब परिधान करू लागली.
Sana Khan : बॉलिवूडच्या या झगमगाटी विश्वात अनेक जण कलाकार म्हणून नाव कमावण्यासाठी येतात. अनेकांना या प्रयत्नांमध्ये यश मिळते, तर काही मात्र या प्रसिद्धीतून संन्यास घेत गायब होतात. अशाच काही कलाकारांपैकी एक नाव म्हणजे सना खान (Sana Khan). सलमान खानचा ‘जय हो’ (Jay Ho) चित्रपट आणि ‘बिग बॉस’ (Bigg Boss) यातून सनाने भरपूर प्रसिद्धी मिळवली. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच तिने मनोरंजन विश्वातून काढता पाय घेतला. इतकंच नव्हे, तर एका मौलवी आणि उद्योगपती असणाऱ्या मुफ्ती अनसशी निकाह करत धर्माचा मार्ग स्वीकारला. यामागचं नेमकं कारण आता सनाने सांगितलं आहे.
नेहमीच आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी सना अचानक धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेऊन हिजाब परिधान करू लागली. तिच्या या निर्णयाने सगळ्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. तिने आपला ग्लॅमरस लूक सोडून हिजाब परिधान करायला सुरुवात केली. मुफ्ती अनस सईद यांच्याशी निकाह केल्यानंतर तिने धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. सनाने हे का केले, याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती अनेकवेळा भावूकही होताना दिसत आहे.
काय म्हणाली सना खान?
नुकताच सना खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये सना आपण हिजाब परिधान करण्याचा निर्णय का घेतला याविषयी सांगताना दिसली. सना तिच्या व्हिडीओमध्ये म्हणाली की, ‘माझ्या आधीच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी होत्या. नाव, प्रसिद्धी, पैसा...मी मला हवं ते सगळं करू शकत होते. मात्र, माझ्या आयुष्यात काहीतरी कमी होती. मात्र, आयुष्यात मन:शांती मिळत नव्हती. माझ्याकडे सगळं काही होतं, पण आनंद मिळत नव्हता. मी खूप नैराश्यात होते. तेव्हा, मला अल्लाचा संदेश मिळाला.
View this post on Instagram
... आणि ठरवलं की आता हिजाब परिधान करणार!
सना पुढे म्हणाली की, रमजानच्या महिन्यात तिला स्वप्न पडलं. या स्वप्नात तिला एक जळती कबर दिसली. ही कबर मोकळी नव्हती, तर त्यात ती स्वतः होती. या स्वप्नामुळे सनाला वाटू लागले की, देवच तिला संकेत देत आहे की, धर्माच्या मार्गावर चालले नाही, तर हाच आपला अंत असेल. हे स्वप्न बघितल्यानंतर तिच्यात अनेक बदल झाले. त्यानंतर ती अनेक मोटिव्हेशनल भाषणं ऐकू लागली. त्यात तिने हिजाबबद्दल एक विचार ऐकला, जो तिच्या मनाला भावाला. अगदी वाढदिवसाच्या दिवशी तिने अनेक स्कार्फ खरेदी केले आणि ते डोक्याला बांधले. त्यानंतर तिने निर्णय घेतला की, आता कधीच ती ते सोडणार नाही.’
हेही वाचा :