Happy Birthday Sana Khan : आधी प्रेमात धोका मिळाला, मग धर्मासाठी तिने थेट निकाहच केला! वाचा अभिनेत्री सना खानबद्दल...
Sana Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) आज (21 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे.
Sana Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) आज (21 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. कधी ब्रेकअप तर कधी निकाह, अनेक कारणांमुळे सन खान नेहमीच चर्चेत राहिली आहे. सलमान खानसोबत (Salman Khan) 'जय हो' (Jai Ho) चित्रपटात सना खान दिसली होती. याशिवाय तिने ‘स्पेशल ऑपरेशन’मध्येही महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. मात्र, नंतर सना खानने अचानक लग्न केले आणि बॉलिवूड विश्वाला अलविदा केला. लग्न करत स्वतः तिनेच आपले करिअर सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबईतील धारावी येथे 1987मध्ये जन्मलेली सना खान आज तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. तिची आई सईदा या मुंबईच्या रहिवासी आहेत. तर, तिचे वडील कन्नूरचे मल्याळी मुस्लिम आहेत. फार कमी वयातच तिने बॉलिवूड करिअर सोडण्याचा निर्णय घेत, एका धर्मगुरूसोबत लग्नगाठ बांधल्याने अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली होती,
सलमान खानमुळे चमकले नशीब
सना खानने 2005 मध्ये 'ये है हाय सोसायटी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने अभिनय विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'बॉम्बे टू गोवा', 'धन धना धन गोल' या चित्रपटांमध्ये तिने विशेष भूमिका केल्या. यानंतर तिने साऊथ इंडस्ट्रीतही आपला प्रवास सुरू केला. ती सलमान खानसोबत 'जय हो' चित्रपटात दिसली होती. यानंतर त्यांनी 'वजाह तुम हो' आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात देखील ती झळकली.
सलमान खानमुळे सना खानचे नशीब चमकवले होते. ‘बिग बॉस सीझन 6’मध्ये सना खान एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या पर्वात ती सलमान खानची आवडती स्पर्धक बनली होती. सना खानने तिच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली.
ब्रेकअपनंतर नैराश्यात गेली अभिनेत्री!
सना खानचे अफेअर कोरिओग्राफर मेल्विन लुईससोबत सुरु होते. मात्र,काही काळानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. मेल्विन लुईस हा एक लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. दोघेही त्यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होते. मात्र, अचानक त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर सना डिप्रेशनची शिकार झाली होती आणि एवढेच नाही तर तिने झोपेच्या गोळ्या घेतल्याचेही बोलले जात होते. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते.
लग्न करत बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला!
मुफ्ती अनससोबत अचानक लग्न करून सना खानने लाखो चाहत्यांची हृदये तोडली. सना खानने लग्नाआधीच मनोरंजन क्षेत्र सोडण्याची घोषणा केली होती. अल्लाहने दाखवलेल्या मार्गावर आता चालणार असल्याचे तिने म्हटले होते. वेब सीरिज ‘स्पेशल ऑप्स’ हा तिचा शेवटचा प्रोजेक्ट होता.
हेही वाचा :
लग्नानंतर पतीसोबत ड्राईव्हसाठी निघाली सना खान; रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल