Samantha Ruth Prabhu : 'या' आजाराचा सामना करत आहे समंथा? उपचारासाठी परदेशात गेल्याची चर्चा
सध्या समंथा (Samantha Ruth Prabhu) ही एका आजाराचा सामना करत आहे, अशी चर्चा सुरु आहे.
Samantha Ruth Prabhu : पुष्पा चित्रपटातील ओ अंटवा गाण्यामधील ग्लॅमरस आणि हॉट अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या ती एका आजाराचा सामना करत आहे, अशी चर्चा सुरु आहे. यावर उपचार घेण्यासाठी ती परदेशात गेली आहे, असंही म्हटलं जात आहे. समंथा उपचारासाठी परदेशात गेल्यानं तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग देखील थांबवण्यात आलं आहे.
या आजाराचा सामना करत आहे समंथा
समंथा ही 'पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन' (Polymorphous Light Eruption) या आजाराचा सामना करत आहे, असं म्हटलं जात आहे. हा त्वचेचा आजार आहे. या आजारावर उपचार घेण्यात समंथा ही अमेरिकेमध्ये गेली आहे, अशी चर्चा सुरु आहे. समंथानं अजून तिच्या आजाराबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. समंथा तिच्या खुशी या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत होती पण या उपचारासाठी ती परदेशात गेल्यामुळे आता या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे, असंही म्हटलं जात आहे.
समंथा लवकरच यशोदा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. 'यशोदा' हा सायन्स फिक्शन-थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात समंथा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. सिनेमात समंथासोबत वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पना गणेश, दिव्या श्रीपदा, प्रियांका शर्मा हे कलाकारदेखील दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी समंथानं कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती.
View this post on Instagram
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Samantha Ruth Prabhu : ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर समंथाने सांगितलं लग्न तुटण्याचं कारण, म्हणाली....
- Samantha Ruth Prabhu बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करण्यासाठी सज्ज, या 'हॉरर कॉमेडी' चित्रपटात दिसणार!