Salman Khan: भाऊबीजेच्या शुभेच्छा देत सलमाननं शेअर केला शर्टलेस फोटो; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
नुकताच बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला.
Salman Khan: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. काल देशभरात भाऊबीजेचा सण साजरा करण्यात आला. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या चाहत्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. नुकताच बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला. या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
सलमाननं शेअर केला शर्टलेस फोटो
सलमान खाननं सोशल मीडियावर त्याचा एक मोनोक्रोम फिल्टरमधील फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सलमान शर्टलेस दिसत आहे. फोटोमध्ये सलमाननं त्याचे सिक्स पॅक फ्लॉन्ट केले. तर फोटोमध्ये सलमाननं ब्लॅक गॉगल घातलेला दिसत आहे.
चाहत्यांनी केल्या कमेंट्स
सलमान खानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सलमानच्या चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे. एका युजरनं कमेंट केली, "मस्त रे बाबा." तर दुसर्याने कमेंटमध्ये लिहिले की, "सलमान परत आला आहे." एक नेटकरी म्हणाला, "एक नंबर भाऊ". त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले - "हँडसम जान."
View this post on Instagram
सलमान खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'टायगर 3'मध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. त्याचबरोबर शहनाज गिल ते पलक तिवारीसारखे नवे स्टार्स 'किसी का भाई किसी की जान'मध्ये दिसणार आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त सलमान खान 'बिग बॉस 16' देखील होस्ट करत आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Salman Khan: 'बिग बॉससाठी घेतलं कोट्यवधींचे मानधन?' सलमान म्हणाला, 'एवढे पैसे मिळाले तर आयुष्यभर...'