Salman Khan: 'बिग बॉससाठी घेतलं कोट्यवधींचे मानधन?' सलमान म्हणाला, 'एवढे पैसे मिळाले तर आयुष्यभर...'
सलमान बिग बॉससाठी कोट्यवधींचे मानधन घेतो, अशी चर्चा सोशल मीडियावर होत असते. आता सलमाननं त्याच्या मानधनाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

Salman Khan: बिग बॉस 16 (Bigg Boss 16) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. छोट्या पडद्यावरील या वादग्रस्त कार्यक्रमाची सुरुवात 1 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. या सिझनमध्ये कोण सहभागी होणार? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. कार्यक्रमाच्या एका स्पर्धकाची घोषणा नुकतीच सलमाननं केली आहे. अब्दु रोजिक (Abdu Rozik) हा या सिझनमध्ये सहभागी होणार आहे. सलमान बिग बॉससाठी कोट्यवधींचे मानधन घेतो, अशी चर्चा सोशल मीडियावर होत असते. आता सलमाननं त्याच्या मानधनाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
काय म्हणाला सलमान?
सलमान खानने बिग बॉसच्या 15व्या सिझनसाठी 350 कोटी रुपये फी आकारली होती. तर, आता त्याने नव्या सिझनसाठी तिप्पट फी मागितली आहे. म्हणजेच 'बिग बॉस 16'साठी अभिनेता सुमारे 1000 कोटी रुपये आकारणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. मुंबईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये सलमान खानला बिग बॉससाठी मिळणाऱ्या मानधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला सलमाननं उत्तर दिलं. तो म्हणाला , 'एवढे पैसे मला कधीच मिळणार नाहीत. मला जर एवढे पैसे मिळाले, तर मी आयुष्यभर काम करणार नाही. मला खूप खर्च आहेत. जसं की वकिल.' सलमानला शो सोडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला सलमाननं उत्तर दिलं, 'माझी चिडचिड झाली तर मी शो सोडतोय असं म्हणतो, पण तसं होत नाही. इथले लोक मला जाऊ देत नाहीत. त्यांच्याकडे इतर कोणते पर्याय नाहीत.' पुढे सलमान म्हणाला, ' या शोमधून खूप काही शिकायला मिळेल. मी भरकटलेल्या लोकांनाही भेटतो आणि त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणायला मला आवडते.'
1 ऑक्टोबरला सुरु होणार शो
1 ऑक्टोबरला बिग बॉसचा 16 सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुम्बुल तौकीर, गौतम विज आणि अब्दु रोजिक हे स्पर्धक सहभागी होणार आहेत. मुनव्वर फारुकी, कनिका मान, ट्विंकल कपूर, विवियन डिसेना, फैसल शेख, शिविन नारंग आणि फरमानी नाज हे कलाकार देखील शोमध्ये सहभाही होतील, अशी चर्चा आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Bigg Boss 16 : युट्यूबर अब्दु राजिक होणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये सहभागी; व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
