एक्स्प्लोर
सलमान खान सरोगसीच्या माध्यमातून बाबा होणार?
अभिनेता सलमान खान येत्या काही महिन्यात सरोगेट पद्धतीने बाबा होण्याची चर्चा पुन्हा रंगली आहे

फोटो सौजन्य : गेट्टी इमेजेस
मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर अशी ख्याती असलेला अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्यातच सलमान बाबा होण्याची तयारी करत असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. सलमान सरोगसीच्या माध्यमातून पितृत्व अनुभवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. वडील सलीम आणि आई सलमा खान यांना नातवंडांचं तोंड पाहायचं असल्याचं सलमान खानने सांगितलं होतं. त्यामुळे येत्या काही महिन्यात सरोगेट पद्धतीने वडील होण्याचा सलमानचा मानस आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. सलमानने मात्र सरोगसीच्या चर्चांवर अद्याप उत्तर दिलेलं नाही. सलमानचा भाऊ सोहेल खाननेही सरोगसी पद्धतीने मुलगा योहानला जन्म दिला आहे. त्यामुळे एकाच कुटुंबात सरोगसीने दोन मुलं जन्माला येण्याची तुषार आणि एकता कपूरनंतर ही सेलिब्रेटी फॅमिलीमधली दुसरीच घटना असेल. सरोगसीची संकल्पना बॉलिवूडसाठी नवीन नाही. करण जोहर आणि तुषार कपूर हे सरोगसीद्वारे सिंगल फादर झाले आहेत. तर शाहरुख आणि आमीर यांनी लग्नानंतर सरोगसीद्वारे पितृत्व स्वीकारलं. हे वृत्त खरं ठरल्यास करण जोहर आणि तुषार कपूरनंतर सलमान खान बॉलिवूडचा सिंगल सरोगेट फादर असेल. अभिनेता सलमान खान हा 53 वर्षांचा आहे. ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, युलिया वंतुर यासारख्या अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. मात्र बॉलिवूडच्या मोस्ट एलिजिबल बॅचलरचे अद्याप दोनाचे चार हात झालेले नाहीत. बॉलिवूड आणि सरोगसी 1. आमीर खान-किरण राव - 5 डिसेंबर 2011 रोजी मुलगा आझादचा जन्म 2. शाहरुख-गौरी खान - 27 मे 2013 रोजी मुलगा अबरामचा जन्म. सुहाना आणि आर्यन या दोन मुलांनंतर तिसऱ्या वेळी सरोगसीद्वारे पालकत्व 3. तुषार कपूर - जून 2016 मध्ये सरोगसीद्वारे मुलगा लक्ष्यचा जन्म 4. एकता कपूर - 27 जानेवारी 2019 रोजी मुलगा रवीचा जन्म. सरोगसीद्वारे सिंगल मदर 5. सनी लिओन - फेब्रुवारी 2018 मध्ये अॅशर आणि नोआ या जुळ्या मुलांना सरोगसीच्या माध्यमातून जन्म 6. करण जोहर - फेब्रुवारी 2017 मध्ये रुही आणि यश या जुळ्या मुलांना सरोगसीच्या माध्यमातून सिंगल फादर 7. श्रेयस तळपदे - मे 2018 मध्ये सरोगसीद्वारे मुलीला जन्म
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























