Salman Khan: 'सलमान भाऊ...'; रितेश देशमुखची स्पेशल पोस्ट, भाईजानला दिल्या भरभरुन शुभेच्छा
अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला रितेशनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचे चाहते तसेच अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला शुभेच्छा देत आहेत. नुकतीच अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला रितेशनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
रितेशची पोस्ट
रितेशनं सलमानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला रितेशनं कॅप्शन दिलं, 'आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते, जी तुमच्या मागे खंबीरपणे उभी असते. आधाराची गरज आहे की नाही? हे तुम्हाला न विचारता ती व्यक्ती तुम्हाला कायम अधार देत असते. माझ्या आयुष्यात ती व्यक्ती सलमान भाऊ आहे. माझे त्याच्यावर किती प्रेम आहे? हे व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ...'
पाहा पोस्ट
View this post on Instagram
जिनिलियाची पोस्ट
वेड चित्रपटाच्या सेटवरील फोटो नुकताच जिनिलियानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'सलमान भाऊ, तू चांगला आणि दयाळू व्यक्ती आहेस. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.', असं कॅप्शन जिनिलिया देशमुखनं फोटोला दिलं.
View this post on Instagram
सलमान आणि रितेशचं वेड चित्रपटातील गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या वेड या चित्रपटातील वेड लावलंय हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्यात रितेश आणि सलमान खास यांच्या डान्स आणि स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधले. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
