Saif Ali Khan : सैफ अली खानवरील हल्ल्यावेळी घरात एकच आरोपी नव्हता? मोहम्मद शहजादचा साथीदार कोण? पोलीस तपासात धक्कादायक माहिती
Saif Ali Khan Stabbing Case : सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपी मोहम्मदचा आणखी साथीदार असल्याचा पोलिसांना संशय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Saif Ali Khan Knife Attack Case : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मदचा आणखी इतरही साथीदार असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी मोहम्मद हा एकटाच आरोपी नसून त्याचा साथीदार असल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेता सैफ अली खानच्या राहत्या घरी घुसून चोरट्याने त्याच्यावर चाकूहल्ला केला होता. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत असून या प्रकरणात आता मोठा ट्वीस्ट आला आहे.
सैफ अली खानवरील हल्ल्यावेळी घरात एकच आरोपी नव्हता?
सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. आरोपी मोहम्म शरीफुल इस्लाम शहजादसोबत इतर आरोपी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौकशीदरम्यान हा मोठा खुलासा झाल्याचा माहिती आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.
आरोपी मोहम्मद शहजादचा साथीदार कोण?
या प्रकरणात एक वेगळा ट्विस्ट आहे, कारण पोलिसांना संशय आहे की, आरोपीचा आणखी एक साथीदार असू शकतो. आता आरोपी मोहम्मदचा साथीदार कोण असा नवा सवाल या प्रकरणात उपस्थित झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :