Who is Afsar Zaidi : तैमूर किंवा इब्राहिम नाही, मग सैफला रुग्णालयात कुणी नेलं? मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड, कोण आहे अफसर जैदी?
Who is Afsar Zaidi : अभिनेता सैफ अली खान याला अफसर जैदी या व्यक्तीने लीलावली रुग्णालयात दाखल केल्याची बाब समोर आली आहे.
Saif Ali Khan Knife Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. सैफ अली खानच्या राहत्या घरी घुसलेल्या चोराने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यानंतर रक्तबंबाळ सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चाकूचे अनेक वार झाल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या सैफला रिक्षाने रुग्णालयात नेण्यात आलं. दरम्यान, सैफला रुग्णालयात नेण्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत, असं असताना MLC रिपोर्टवरुन धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
सैफ अली खानला रुग्णालयात नेलं कुणी?
जखमी सैफ अली खानला इब्राहिम अली खान रिक्षातून रुग्णालयातून घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर सैफ तैमूरला सोबत घेऊन स्वत:च रुग्णालयात गेल्याचं बोललं जात होतं. आता मात्र, सैफला रुग्णालयात नेणारी व्यक्ती तिसरीच असल्याचं समोर आलं आहे. आता लीलावती रुग्णालयाच्या रिपोर्टनुसार, सैफ अली खानला त्याचा अफसर झैदी या व्यक्ती रुग्णालयात दाखल केल्याचं समोर आलं आहे.
मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड
आता लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, सैफ अली खानला त्याचा मित्र अफसर झैदीने लीलावती रुग्णालयात नेलं होतं. मेडिकल फॉर्मवर त्याची सही आहे. यामुळे आता सैफ अली खान हल्ला प्रकरणात अफसर झैदीचे नाव समोर आलं आहे. आता अफसर झैदी कोण आणि त्याचा सैफ अली खानशी काय संबंध आहे, इतक्या दिवसांनी हे नाव सर्वांसमोर का आले? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
सैफ अली खानवर 5 वार
अभिनेता सैफ अली खानच्या शरीरावर पाच ठिकाणी चाकूने वार करण्यात आले. यामुळे त्याच्या पाठीला, मनगटाला, मानाला, खांद्याला आणि कोपराला दुखापत झाली. सैफच्या जखमांचा आकार 0.5 सेमी ते 15 सेमी पर्यंत होता, असं मेडिकल रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. त्याचा मित्र अफसर झैदी त्याला ऑटो रिक्षातून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात घेऊन गेला, असं सैफच्या वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे. मध्यरात्री 2.30 वाजता हल्ला झाला आणि सैफचा मित्र अफसर त्याला पहाटे 4:11 वाजता लीलावती रुग्णालयात घेऊन गेला आणि त्याने कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केली.
अफसर जैदी कोण आहे?
सैफ अली खानच्या मेडिकल लीगल केस रिपोर्ट म्हणजेच MLC रिपोर्ट 59 मध्ये अफसर जैदीचा उल्लेख मित्र असा केलेला आहे. अफसर झैदी हे बॉलिवूड जगतातील प्रसिद्द नाव आहे. अफसर झैदी यांचे पूर्ण नाव अफसर अब्बास झैदी आहे. अफसर झैदी अभिनेता हृतिक रोशनसह देशातील सर्वात मोठ्या होम फिटनेस ब्रँड HRX चा सह-संस्थापक आहे. अफसर झैदीने 2005 मध्ये एक्सीड एंटरटेनमेंटची स्थापना केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :